इतर

समाजाच्या उज्वल भविष्यासाठी बालकांचे आरोग्य महत्वाचे – डॉ. शिवानी सोमा


मोफत सुवर्णबिंदू प्राशन’ कार्यक्रमास आजी, आजोबा व पालकांसह मुलांची झुंबड…

सोलापूर : (दि. २२ मे)


‘बालकांचे आरोग्य हे उद्याच्या समाजाच्या दृष्टीने उज्वल भविष्य असून भविष्यात पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी उचललेला ‘आयुर्वेदिक शिबिर’ हे पहिले पाऊल म्हणायला हरकत नाही. सुवर्णबिंदू प्राशन हा आयुर्वेदिक दिव्य औषधी असून यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीचे ‘ब्राम्ही’, ‘शंखपुष्पी’, ‘वचा’ यांचे मिश्रण करुन यामध्ये ‘मध’ आणि ‘तूप’ घालून अत्यल्प प्रमाणात ‘सुवर्णभस्म’ मिश्रण केला जातो, यालाच ‘सुवर्णबिंदू’ म्हटले जाते. ‘सुवर्णबिंदू’ प्रत्येक महिन्यात ‘पुष्यनक्षत्र’ दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर देतात. जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या सोळा वर्षांपर्यंत दिले जाते. ‘सुवर्णबिंदू प्राशन’ याचे फायदे मुलांना लहान वयात दिल्याने बुध्दी, स्मरणशक्ती, रोग प्रतिकारशक्ती वाढून अभ्यासावरती लक्ष केंद्रित होतो. यासाठी प्रत्येक महिन्याला येणा-या ‘पुष्यनक्षत्र’ रोजी आपल्या मुलांना न चुकता ‘सुवर्णबिंदू’ पाजवावे, असे मत डॉ.शिवानी सोमा यांनी व्यक्त केले


गुरुवारी गुरुपुष्यामृताचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व कौशल्या बहुउद्देशीय व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोमा क्लिनिक, वैष्णव मारुती मेडिकल यांच्या सहकार्याने मोफत सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रम आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेविका दिपीका यलदंडी, डॉ. सोमा, महापालिका परिवहनचे माजी सदस्य परशुराम भिसे, वैष्णव मारुती देवस्थानाचे अध्यक्ष भास्कर राऊळ, खजिनदार दीपक परदेशी, विश्वस्त नारायण दुभाषी, अरुण बोध्दूल, फाउंडेशन व सखी संघम’चे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सोमा पुढे म्हणाल्या, आजकालच्या धावफळीच्या आयुष्यात मुले खेळत नसल्याने शारीरिक हालचाल कमी होऊन रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. तसेच जंकफूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने शरीर स्थूल होऊन धोकायदायक परिस्थिती निर्माण होत आहे. यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, प्रत्येक व्यक्ती समाजासाठी देणे लागतो, म्हणून आपापल्या परिने योगदान दिले पाहिजे.

याप्रसंगी ‘लकी ड्रॉ’ काढून आदित्य आडम, संस्कृती दिड्डी, सुमीत फलमारी, वरुण राऊळ आणि अभिनव म्याकल या पाच विजेत्यांना प्रत्येकी एक सुवर्णबिंदू बाटली वैष्णव मारुती मेडिकल तर्फे देण्यात आले. नगरसेविका दिपीका यलदंडी यांनी स्वागत केले. वासुदेव यलदंडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत, प्रास्ताविक करुन आभार मानले. याप्रसंगी फाउंडेशनचे श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, पुरोहित सुधीर सोमा, मल्लेशम जोगू, सतीश चिटमील, अमर सामल, सखी संघमचे पल्लवी संगा, वनिता सुरम, गीता भूदत्त, भाग्यलक्ष्मी तुम्मा, कौशल्या बहुउद्देशीय संस्थेचे कृष्णवेणी दिड्डी, उमा परशी यांचे कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य मिळाले. यावेळी ॲड. रोहन सोमा, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मरगल, राजेंद्र सोमा, श्रीनिवास काडगी, दर्शना सोमा, वर्षा सोमा, भावना एक्कलदेवी, नवल फलमारी यांच्यासह सुवर्णबिंदू घेण्यासाठी लहान मुलांसोबत आजी, आजोबा व आईवडिलांची तब्बल ४०० पेक्षा अधिक जणांची उपस्थिती होती. संध्याकाळी सहा नंतर वैष्णव मारुती देवस्थान जवळील सोमा क्लिनिक येथे पुन्हा मुलांना सुवर्णबिंदू देण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button