नाशिक रोटरी क्लब कडून अनाथालयाला मदत

*नाशिक प्रतिनिधी
*रोटरी क्लब ऑफ नासिक गेल्या 82 वर्षापासून नाशिकमध्ये समाजोपयोगी कार्य करत आहे. काळानुरूप रोटरी क्लब आपल्या नवनवीन योजना अमलात आणत असतो. स्किन बँक, मदर मिल्क बँक, रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड, बचत गटांना आर्थिक सहाय्य, बंधारे बांधणे, हॉस्पिटलला मशीनरी उपलब्ध करून देणे, ग्लोबल ग्रँट आणि सी एस आर च्या सहाय्याने उपक्रम राबविणे. असेच आज चंदुलाल शहा अध्यक्ष असलेल्या निरीक्षण गृह आणि बाल गृह (अनाथालय), मायको सर्कल येथे रोटे. शेखर ब्राह्मणकर यांच्या इलेक्ट्रो क्रिंप कॉन्टॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक या कंपनीच्या CSR मधून १० बेड, १० गाद्या, उश्या, चादरी, उशा कव्हर देण्यात आले. तेथील मुलींना अतिशय आवश्यक अशी सत्पात्री मदत झालेली आहे.
*कार्यक्रमात प्रथम चंदुलाल शहा यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली व रोटरीने केलेल्या साहाय्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ नासिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी रोटरी क्लब करत असलेल्या कार्याविषयी माहिती सांगितली तसेच चंदुलाल शहा यांनी अनाथालयाला मदत करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व देणगीदार शेखर ब्राह्मणकर यांनी पुढील कामासाठी देखील देणगी जाहीर केली. सचिव आर्किटेक्ट मकरंद चिंधडे यांनी आभार व्यक्त केले.*
*कार्यक्रमास सहाय्यक प्रांतपाल मुरली राघवन, माजी अध्यक्ष आणि रोटरी ट्रस्टचे ट्रस्टी अनिल सुकेणकर, माजी अध्यक्ष ओमप्रकाश रावत, सीए प्रफुल बरडीया, शिल्पा पारख, सुहास कुलकर्णी, भारत बिरारी, लीना बाकरे, धनपत अग्रवाल, माधवी सुकेणकर उपस्थित होते


