नाशिक रोटरी क्लब कडून ५०० फळझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांचे आदिवासी कुटुंबांना वितरण

नव्या रोटरी वर्षाची पर्यावरण पूरक सुरुवात
नाशिक, दि. १ जुलै २०२६ :
रोटरी वर्ष २०२६–२७ ची सुरुवात रोटरी क्लब ऑफ नाशिकने सालाबादाप्रमाणे पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाने केली. यावर्षीच्या वृक्षारोपण उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नंदिनी नदीच्या काठावरील पिंपळगाव बहुला येथील लांब दहाड वस्तीतील चार आदिवासी कुटुंबांना आंबा, फणस, शेवगा, हादगा, बांबू तसेच विविध औषधी वनस्पतींची एकूण ५०० रोपे प्रदान करण्यात आली. या वृक्षांमुळे संबंधित कुटुंबांना भविष्यात पोषक आहाराबरोबरच उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी लाभार्थी कुटुंबांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गुंबाळे परिवारातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सदस्यांनी वृक्षलागवडीसाठी आवश्यक खड्डे खोदणे, त्यामध्ये माती व खत भरणे तसेच लागवडीची पूर्वतयारी करण्याचे काम हिरीरीने पूर्ण केले.
या प्रकल्पाचे नियोजन प्रोग्राम कमिटीचे रोटे. डॉ. नेहा मेहेर, रोटे. डॉ. विश्वजीत दळवी, क्लबच्या अध्यक्षा रोटे. शिल्पा पारख, सचिव रोटे. ऋषिकेश संमनवार, प्रकल्प सचिव रोटे. हेमराज राजपूत तसेच पर्यावरण संचालक रोटे. सुरेखा राजपूत यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे रोटरी वर्षातील पहिला प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाला बेलगाव ढगा येथील पर्यावरणप्रेमी श्री. दत्तात्रय ढगे व श्री. अक्षय भावले यांनी मोलाचे सहकार्य केले. रोटरीच्या विविध सामाजिक व पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहकार्य करत असून, त्यांच्या योगदानामुळे हा प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविता आला.
वृक्षारोपण कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये जॉइंट सेक्रेटरी रोटे. रेखा पटवर्धन, पास्ट प्रेसिडेंट रोटे. मुग्धा लेले, रोटे. वैशाली रावत,रोटे . विजय दिनानी रोटे. विजय दीक्षित, रोटे. मंगेश व स्मिता अपशंकर, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट रोटे. डॉ. गौरव सामनेरकर व रोटे. मोना सामनेरकर, रोटे. रोहित देशपांडे, रोटे. शशिकांत पारख, रोटे. राज तलरेजा , रोटे . शशिकांत पारख , रोटे . मनीष चीन्अधले, रोटे . डॉ. राजेंद्नेर नेहेते क रोटेरियन मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे आगामी वर्षभरात पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, शिक्षण, आरोग्य व समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



