इतर

शिक्षक तुळशीराम किसन गभाले यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव.


जि.प. प्राथमिक शाळा ठोकवाडी ता. अकोले जि. अहिल्यानगर येथे कार्यरत असणारे शिक्षक श्री तुळशीराम किसन गभाले सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला.
शिक्षण क्षेत्रातील ३३ वर्ष प्रदीर्घ सेवेचा शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्हेरे केंद्रातील सर्व शिक्षक व ग्रामस्थ ठोकळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षांची निवड जि.प. प्राथमिक शाळेचे उपाध्यापक श्री सुधाकर भांगरे सरांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री गोविंद करवंदे सरपंच ग्रामपंचायत शेणीत यांनी भुषविले. राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थींनी नी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच आलेले पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळ, ग्रामस्त यांचे शाल श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन श्री गभाले कुटुंबाकडून सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्त यांच्या वतीने पोषाख, सन्मान चिन्ह,फेटा, पुष्पगुच्छ तसेच त्यांच्या पत्नी सौ. मिराबाई भांगरे यांना नऊवारी, फेटा, फडकी, पुष्पगुच्छ देऊन सेवापूर्ती सत्कारमूर्ती श्री तुळशीराम गभाले गुरुजी सहदांपत्य सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी अनेकांनी गुरुजींचा यथोचित सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.


माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच श्री मुरलीधर भांगरे यांनी त्यांच्या कार्याचा, स्वभावाचा गौरव केला. तसेच श्री विठ्ठल भागा जोशी यांनी ही त्यांच्या कार्याची स्तुती करून शुभेच्छा दिल्या.
सत्कार मूर्ती श्री गभाले गुरुजींनी केक कापून ५८वा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे इच्छा असुनही मान्यवरांची मनोगते होऊ शकली नाही. शेवटी सर्वांसाठी स्नेह भोजना चा गोड कार्यक्रम पार पडला.
श्री गभाले गुरुजी त्यांच्या नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोविंद करवंदे सरपंच ग्रुपग्रामपंचायत शेणीत, प्रमुख पाहुणे श्री मुरली अण्णा भांगरे, मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर, श्री बाळू चौधरी, श्री भीमा कोकतरे, श्री मोहन गभाले, श्री विठ्ठल कवटे, श्री दशरथ सोंगाळ, श्री नानासाहेब नाडेकर, श्री सोमनाथ धिंदळे, श्री तुकाराम मधे, श्री दीपक साळवे, श्री देवराम बांडे, श्री युवराज तळपे, श्री शामराव मुतडक, श्री वामन डगळे, श्री रघुनाथ वायळ, श्री मच्छिंद्र खाडे, सौ अरुणा भांगरे, सौ सुनिता लांघी, श्री रुखा मुठे, श्री लालू धोंगडे, श्री विठ्ठल पटेकर, श्री मीनानाथ गभाले, श्री सुदाम भांगरे, श्री भोरू भांगरे, श्री कारभारी भांगरे, श्री मुरलीधर तळपे, श्री नाथू भांगरे, श्री भाऊराव गभाले, श्री पोपट गभाले, श्री तुकाराम सामेरे, श्री काळू नाडेकर, श्री विठ्ठल काकडे, श्री बाबाजी डूकरे, श्री रामनाथ तांगडकर, श्री सुनिल जाधव, श्री ज्ञानेश्वर फटांगरे, श्री घनशाम नवले, श्री विजय बढे, श्री उत्तम भारमल, श्री अशोक धिंदळे, महार्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षकेत्तर

कर्मचारी,शेणीत, डामसेवाडी, ठोकळवाडी, देवगाव, ग्रामस्त महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री युवराज तळपे यांनी केले व श्री घनशाम नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button