ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी आर्या चे आदर्श यश …

अकोले प्रतिनिधी
.
ग्रामीण भागात सातेवाडी गावात जांभळेवाडी शाळेत फोफसंडीच्या दुर्गम भागात अति पाऊस , डोंगरदऱ्या, उन्हाळ्यात पाण्याची वणवण खेकड मासे पकडत , रानची काळी मैना , जांभूळ, आंबे गोळा करत डोंगरदऱ्यात उड्या मारत आर्याने खोवले जिल्हा परिषद जांभळेवाडी शाळेच्या शिरपेचात मानाचे तुरे ….
सन २०२६- २७ या शैक्षणिक वर्षात कु आर्या संपत दिघे ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावी इयत्तेत शिक्षण घेत आसून तिने गेल्या वर्षभरात …
१ ) राज्यस्तरीय मंथन परीक्षेत कोतूळ केंद्रस्तरीय प्रथम पारितोषिक मिळविले .
2) राज्यस्तरीय लक्षवेध परीक्षेत ब्राम्हणवाडा केंद्रस्तरीय प्रथम पारितोषिक मिळविले .
3) इस्त्रो परीक्षेत तालुक्यात दहावा क्रमांक मिळविला
4) जिल्हा परिषद मिशन आरंभ अंतर्गत कोतूळ केंद्रात प्रथम तालुक्यात आठवा , जिल्हात चौदावा क्रमांक पटकाविला
5 ) जवाहर नवोदय परीक्षेत 94.75 % गुण मिळवले . एक प्रश्नावरून नवोदय प्रवेश अपयश ..
6) शिष्यवृत्ती परीक्षेत 80 . 66 जिल्हा गुणवत्ता यादीत 143 वा क्रमांक ….
गुणवत्ता सिद्ध केली
खेड्यातल्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता असते हे आर्याने सिद्ध करून दाखविले
आर्याच्या शिक्षणाची नेहमी दखल घेणारे व स्वतः शिक्षणाचे धडे देणारे अकोले बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री जनार्दन भवरे साहेबांचे उरी धरलेले स्वन्न साकार झाले .
कोतूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणिय श्री अरविंद कुमावत साहेबांचे मार्गदर्शन आर्याला मायेने जवळ घेऊन दिलेले प्रोत्साहनामुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या .
अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा बाळासाहेब दोरगे साहेबांचे अनमोल मार्गदर्शन व अभिनंदन !
!! ! विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात!!!*
जांभळेवाडी केंद्रातील जि. प. प्रा. शाळा जांभळेवाडी या शाळेतील अतिशय हुशार,
चुणचुणीत विद्यार्थिनी कु.आर्या संपत दिघे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश!!!आणि यामागे तिचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक अशी दुहेरी भूमिका बजावणारे आदर्श शिक्षक श्री.देशमुख सर यांचे अनमोल मार्गदर्शन!
आर्याचे हे यश केवळ गुणपत्रिकेतील आकडे नाहीत तर त्यामागे धैर्य, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आहेत.परिस्थिती माणसाला घडवत नाही, तर माणूस आपल्या जिद्दीने परिस्थिती बदलतो. याची प्रचिती आर्याकडे पाहून येते.तिची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.आर्याच्या या यशासाठी तिचे आई वडील,शिक्षक आणि तिला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचेच मन :पूर्वक अभिनंदन!!! नुकत्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्यात तालुक्याचे लाडके आमदार मा . किरणजी लहामटे साहेब , कोतुळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणिय श्री अरविंद कुमावत साहेब , जांभळेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणिय श्री निलेशजी वाकचौरे साहेब जांभळेवाडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणिय श्री अशोकजी देशमुख सर , सातेवाडी गावचे आदर्श सरपंच श्री बुळे साहेब व वनविभागाचे सर्व पदाधिकारी ग्रामविकास मंडाळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!🌹🌹🌹



