जांभळेवाडी व केळी ओतुर केंद्रातील शाळांमधील सातशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अकोले प्रतिनिधी
वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव गवळी व फोफसंडी येथील आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त श्री दत्तात्रय मुठे यांच्या संकल्पनेतून आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नाविन्यपूर्ण उपक्रमातून सहभागी करून घेण्यासाठी केळी ओतूर व जांभळेवाडी केंद्रातील सातशे विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी व दप्तर यांचे वाटप करण्यात आले

या प्रसंगी श्री नामदेव गवळी, दत्तात्रय मुठे, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जी कुमावत, राजे जी पावशे, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, निलेश वाकचौरे, भाऊसाहेब पुरी व पुष्पा लांडे या सोबतच मा. मुख्या. विजय घनकुटे, मधुकर मुठे, पोपट चौधरी, वैभव लाटणे, सुनंदा पोटकुले, मंदा नवले यांच्यासह शिक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शरद देशमुख हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोडे यांनी केले



