“पारिजात- मुंबई” कडून अकोले तालुक्यातील गरजू ४५० विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्यांचे वितरण*

राजूर/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील एकूण १७ शाळांतील एकूण ४५० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना पारिजात संस्था मुंबईच्या वतीने व अनिल गंभिरे यांच्या प्रयत्नांतून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले.
“पारिजात- मुंबई ” ही एक नोंदणीकृत संस्था असून ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजा लक्षात घेऊन तेथे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्याचे अविरतपणे काम करत आहे. त्यांचा हा उपक्रम राज्यातील २२ जिल्ह्यांतील ३२२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पोहोचला असुन, सदर शाळांतील २५,१६१ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. मराठी शाळा टिकवण्यात या संस्थेचा मोलाचा हातभार आहे. ही संस्था पर्यावरणदृष्ट्या देखील प्रयत्नशील असून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्व मुलांना न्यात व्हावे याकरिता मुलांना स्वतः शाळेच्या परिसात १० वृक्ष लाऊन त्यांची जोपासना करण्यास प्रोत्साहित करत आहे.

त्याचबरोबर गावच्या उपलब्ध वनराई व पडीक जमिनीवर ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयाने वृक्ष लागवड करण्यास देखील प्रोत्साहित करत आहे. हा अगदी स्तुत्य उपक्रम असून याची पूर्तता शाळांनी केल्यास त्यांना पुन्हा शैक्षणिकदृष्ट्या मदत मिळणार आहे.
सदर शैक्षणिक साहित्य तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंबित, शिसवद, कोथळे, माळवाडी (सावरकुटे), खडकी बुद्रुक, मुठेवाडी (शेलद), पिंपरी, विहीर, तळे, कोथळे, बलठण, करटूलेवाडी(बलठण), भोजदरावाडी (बलठण), वैतागवाडी, करवंददरा, देवाचीवाडी (शिरपुंजे व आंबेवंगण या एकूण १७ शाळांमध्ये करण्यात आले. सदर शैक्षणिक किटमध्ये दप्तर, वह्या, कंपास पेटी/पाऊच, चित्रकला वही, सराव पुस्तिका, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर , पट्टी , कलर खडू व क्रेओन इ. एकूण १३ प्रकारचे साहित्य आहेत. सदर साहित्याचा शैक्षणिकदृष्ट्या निश्चितच फायदा होणार आहे. सदर शैक्षणिक साहित्य वितरणा प्रसंगी या शाळांच्या आवारात २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

पारिजात संस्थेच्या वतीने रोहन दांगट, कौशल जटार, किरण ढोबळे, महेश्वरी केळकर, तृप्ती ढोबळे, अमृता दांगट,गिताराम दाते, सुरेश जटार, सुमन दाते, कल्पना जटार, तानाजी दांगट, गिताराम दाते, मीना दांगट, राज्ञी दांगट व अलका जटार उपस्थित होते. तसेच याप्रसंगी या भागातील सामाजिक कार्यकर्ते मा.अनिल भांगरे यांची देखील उपस्थिती होती. तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव घिगे, दत्तात्रय धिंदळे, दत्ता पटेकर, लक्ष्मण कवटे, विद्या घिगे, सुनिता धिंदळे, राजू संगारे, सखाराम धिंदळे, बाळू पारधी, राजुदास राठोड, कोंडाजी देशमुख, सुनिल वेडे, संदीप बांबळे, उज्वला काजळे, भाऊसाहेब कडू, मधुकर साबळे व सोमनाथ धिंदळे तसेच सोबत सहशिक्षक रविंद्र घिगे,बाळासाहेब मेचकर, रामदास भोजने, दत्तात्रय वाळेकर सह इतर शिक्षक व संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व सहशिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.



