इतर

रोटरी क्लब ऑफ नाशिकचा नेशन बिल्डर पुरस्कार सोहळा संपन्न

नाशिक प्रतिनिधी


राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील 15 मान्यवरांना रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे नॅशनल बिल्डर पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सीताराम कोल्हे (माजी अतिरिक्त आयुक्त,नाशिक) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा सौ.शिल्पा पारख होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख यांनी केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी समाजासाठी, देशासाठी करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचा ‘नॅशनल बिल्डर पुरस्कार’ देऊन सन्मान करीत असल्याबद्दल डॉ. सिताराम कोल्हे यांनी रोटरी क्लब नाशिकचे कौतुक केले.

त्यांच्या हस्ते डॉ. योगिता अविनाश आपटे,डॉ. साधना सोनू तांदळे,डॉ. योगेश देविदास वानखेडे,डॉ. डी. के. कन्नोर,डॉ. मिनाक्षी हरिभाऊ गवळी,डॉ. प्रमोद दत्तात्रय वाघ,अंबादास रामदास तांबे,
मंजुश्री राठी,डॉ. तेजश्री ठाकरे, अनिल दगडू बाविस्कर,. रमेश दत्तात्रय पठाडे,संगीता रुस्तुम कांबळे, सुनील सुकदेव बस्ते,निर्मला पुंडलिक चौधरी, पोटे छाया अशोक, यांचा नॅशनल बिल्डर पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गौरी कुलकर्णी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे सेक्रेटरी ऋषिकेश संम्मनवार यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला हेमराज राजपूत, कीर्ती टाक,विनायक देवधर,अनिल सुकेनकर, रवी महादेवकर, सुचिता महादेवकर, विजय दिनानी,नेहा विधाते, सोनाली चिंधडे, रोहित देशपांडे, प्रणाली देशपांडे, रफिक बोहरा, दयमंती बरडिया आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button