इतर

हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन च्या नर्सिंग कॉलेज मध्ये . विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

..

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील निसर्गरम्य परिसरातील नव्याने प्रवेश घेतलेल्या हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

नवागत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन वातावरणाशी स्नेहपूर्ण परिचय व्हावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सकारात्मक सुरुवात मिळावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प पेन व गोड लाडू देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे होते

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ एम.के. भांडकोळी
सचिव डॉ ज्योती भांडकोळी माजी नगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी. उद्योजक ज्ञानेश्वर आरोटे. बिरबल वाकचौरे. वाळेकर प्राचार्य कविता माने मॅडम उपप्राचार्य कीर्ती गंदले
पंकज प्रधान सौरभ वर्पे कोमल गंगुले मॅडम आकांक्षा बोराडे मॅडम तनया बर्वे यांनी शिक्षक व्यवसायातील जबाबदाऱ्या आणि भविष्यातील विविध संधी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ एम.के.भांडकोळी, सचिव डॉ. ज्योती भांडकोळी यांनी ही संस्था सुरू करून तिसऱ्या वर्षात वर्धापन करत असताना शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा या संस्थेने सुरू केली या संस्थेचे विद्यार्थी उद्या भारतात कोठेही आरोग्य सेवेचे काम करत असल्यास नक्कीच त्यांच्या हातून चांगलं कार्य घडेल या संस्थेचा वेलू गगनावरील नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे

. कार्यक्रमाला पूजा आघान,राजेंद्र भांडकोळी महेक इनामदार
मुक्ता पदमेरे भूमिका चौधरी यश कसबे प्रथमेश कवडे
सरस्वती उघडे कोमल गमाले साक्षी पवार मनीषा दिघे
वैशाली मधे वैष्णवी पारधी वैशाली आघान ज्योती बांडे
तुषार दराडे वसुंधरा कचरे या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button