रायगड जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हा माहिती अधिकारी हवेत- डॉ. जयपाल पाटील

अलिबाग :- संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेला रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचे फलोत्पादन कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भरत शेठ गोगावले, महाड आणि दुसऱ्या महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री नामदार कुमारी आदिती तटकरे श्रीवर्धन ह्यां असून रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी हे पद जुन२०२३ वर्षापासून रिक्त असून ते तातडीने भरावे यासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ पत्रकार असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा डॉ. जयपाल पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यामध्ये ते म्हणतातरायगड जिल्ह्यात अनेक दैनिक व साप्ताहिक असून वृत्तपत्रात येणाऱ्या जिल्ह्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन व जनतेसाठी जिल्ह्याला जिल्हा माहिती अधिकारी असणे गरजेचे आहे आणि तो प्रशासन व जनतेत मधील दुवा आहे. रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनात दोन कॅबिनेट मंत्री असल्यामुळे अनेक महिला व्यक्ती जिल्ह्याच्या भेटीस येतात त्यांची अधिकृत योग्य माहिती ते देऊ शकतात जिल्ह्यात सध्या अधिकृत ६४ पत्रकार असून त्यांना जिल्हा माहिती कार्यालयात अधिकृत माहिती अधिकारी नसल्याने फार अडचण निर्माण होते, रायगड जिल्ह्याची जबाबदारी ठाणे येथील जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सानप यांच्याकडे दिलेली आहे, रायगड जिल्हा कार्यालयात असलेले कर्मचारी अधिकृत माहिती देऊ शकत नाहीत.
श्री. मनोज सानप जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी शासनाकडे पिंपळ भाट येथे अद्यावत पत्रकार भवन बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता, तो सध्या शासनाकडे धूळखात पडलेला आहे, रायगड जिल्ह्यातून पत्रकार जिल्हा माहिती कार्यालयात भेटीस आल्यावर त्या कार्यालयात स्वच्छतागृहाची ही व्यवस्था नाही विशेष म्हणजे जिल्हा कार्यालयात दोन महिलाही कर्मचारी आहेत, हे कार्यालय अलिबाग मध्ये भाड्याच्या जागेत असताना तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणले तेथे स्वच्छतागृह बांधताना शेजारी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला त्यामुळे येथे येणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना स्वच्छतागृहाची शोध मोहीम घ्यावी लागते, मात्र हेच कार्यालय पिंपळ घाट येथे अद्यावत झाल्यास अनेक ज्येष्ठ पत्रकारांची गैरसोय ही कळेल. जिल्हा माहिती कार्यालय अधिकाऱ्यास स्वतःचे वाहन मिळावे म्हणून अलिबागच्या सर्व पत्रकारांनी खासदार आमदार व मंत्री महोदयांकडे आवाज उठविल्यानंतर नवे कोरे वाहन आले मात्र त्यामध्ये बसण्यात जिल्हा माहिती अधिकारी नाही अशी सध्याची स्थिती आहे.रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत असून जिल्हा माहिती कार्यालयातील छायाचित्रकार आणि कारकून विविध कार्यक्रमात उपस्थित राहून बातमी देण्याचं काम करीत असतात, याच कार्यालयासाठी जिल्हा माहिती अधिकारी मुख्य तथा सहाय्यक माहिती अधिकारी ही एक जागा असून कोकण भवन येथील माहिती कार्यालयात कार्यरत आहेत असा रायगड जिल्हा माहिती कार्यालयाचा कार्यभार सुरू आहे. रायगडच्या पत्रकारांवर आलेल्या या आपत्तीकडे जातीने पालकमंत्री ना.भरत शेठ गोगावले, नाम. अदिती ताई तटकरे यांनीही लक्ष तातडीने घालावे,अशी ज्येष्ठपत्रकारांची सुद्धा मागणी आहे, देशात पत्रकार हा चौथा स्तंभ असून त्यांच्याकडे जाणून बुजून महाराष्ट्राचे माहिती संचालनालय कसे दुर्लक्ष करते,यासाठी निवेदनाच्या प्रती देशाच्या राष्ट्रपती महोदया श्री. द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे
राज्यपाल जिष्णू देव वर्मा, माहिती संचालनालयाचे मुख्य अधिकारी श्री. ब्रिजेश सिंह यांना प्रति पाठविल्या आहेत.



