इतर

महात्मा गांधींनी धर्माचा अभिमान बाळगला, मात्र त्यांचा धर्म द्वेष आणि मत्सराने भरलेला नव्हता – संदीप वाकचौरे

संगमनेर प्रतिनिधी
महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते त्यामुळे त्यांच्या मागे अवघा देश उभा राहिला होता. गांधीजींनी अखंड जीवनभर भारतीय परंपरेचा आणि धर्माचा अभिमान बाळगला, मात्र त्यांचा धर्म माणूसपणापासून दूर गेलेला नव्हता. द्वेष आणि मत्सराने भरलेला नव्हता असे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले.

ते सबनीस शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रमुख व्यक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक वाल्मीकराव चौधरी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे उपस्थित होते.
आपल्या भाषणात वाकचौरे म्हणाले की, महात्मा गांधींनी जीवनभर उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जीवनातील अनुभव घेत असतात त्यांना जे जे उत्तम वाटले ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला. केवळ विचार वाचणे ,ऐकणे या पलीकडे त्यांनी विचाराची कास धरून ते आपल्या जीवनात आचरणात कसे आणता येतील यावर अधिक भर दिला. माणूस म्हणून जगताना झालेल्या चुकांचे देखील त्यांनी आपल्या आत्मचरित्र उल्लेख केला आहे .माणसाने जसे वागले तसे लिहिणे यासाठी सुद्धा धाडस लागते .ते धाडस त्यांनी दाखविले आहे. म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ करतात सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला होता. माणसातील जातीभेद मान्य नव्हते. सर्वच माणसे ईश्वराची लेकरं आहेत ही त्यांची धारणाच त्यांच्यातील माणूसपण अधोरेखित करणारे आहे. स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान हा देश कधीच विसरणार नाही. गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. गांधी नावाचा कोणताही वाद नाही असे ते सांगत.तो केवळ समाजातील चांगुलपणाचा विचार आहे. आपणही गांधी समजून घेताना त्यांच्यातील माणूसपणाची उंची समजून घेण्याची गरज आहे. समाज माध्यमांमधून गांधीवर होणारी टीका म्हणजे गांधी समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत.त्यामुळे गांधींचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र समाजाचे अधिक नुकसान झाले आहे.हे नाकारता येणार नाही.गांधीनी सातत्याने आपला देश समोर ठेवला होता.त्यांनी संपूर्ण देश फिरून नेतृत्व केले होते.त्यांनी निवडलेल्या मार्गाचे आजही जगाला मोहिनी आहे.
वाल्मिक चौधरी यांनी गांधीचा प्रामाणिकपणाचा मार्ग जीवन उन्नतीचा मार्ग आहे.जीवनाचा मार्ग त्या दिशेने जाणारा असेल तर समाधान, आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले.पाहुण्यांचा परीचय मुरादे यांनी करून दिला.यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. सुनिता पाटोळे प्रा.शरद तरटे प्रा. वैभव खराडे ग्रंथपाल सय्यद तनवीर मुख्य लिपिक कु. रेश्मा मेहेर सेवक अरविंद बेनके उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन – इरम पटेल यांनी तर
प्रास्ताविक वृषाली वसंत काकडे यांनी केले.
आभार सुधीर डोके यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button