इतर

जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

संगमनेर : जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या उपप्राचार्य माधुरी शेवाळे यांनी स्वागतपर भाषण केले.


दिलीप उदमले यांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीतून संवाद साधत अब्दुल कलामांचा जीवनपट ओघवत्या शैलीत मांडला ..
तसेच वाचनाचे महत्व, पुस्तके वाचनातून आपण कसे समृद्ध होतो ते शशांक गंधे यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.साहित्यिक मंडळाच्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर गोंटे यांनी प्रास्ताविक केले व मंडळाच्या सर्व सदस्यांचा परिचय करुन दिला.निधी कोल्हे आणि अर्णव कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी सूत्र संचलन केले.
यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी रेषातुन व्यंगचित्र साकारली,त्यांच्या प्रबोधनपर व्यंगचित्रातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.शेवटी शाळेच्या प्राचार्या जिज्ञासा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरेश परदेशी यांनी गीत सादर केले.


यावेळी संगमनेर साहित्यिक मंडळाचे मेजर लक्ष्मण ढोले, ज्ञानेश्वर राक्षे, ज्ञानेश्वर गोंटे, विजय दीक्षित, शेख ईद्रीस, रमेशकाका सराफ, विश्वनाथ ठाकरे, नेहे सर, चारूदत्त काटकर, डॉ.जी.पी.शेख, बाळकृष्ण महाजन, मुकुंद डांगे,सुरेश परदेशी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे व संगमनेर साहित्यिक मंडळाचे सचिव ज्ञानेश्वर राक्षे व उपाध्यक्ष व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button