इतर

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा  कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे .

  राज्यपाल विष्णूदेव वर्मा यांचेकडून नियुक्ती आदेश जारी . 

    —————————————-

  अकोले  प्रतिनिधी 

   महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ( एम् पी एस सी ) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा नियुक्ती आदेश राज्यपाल विष्णूदेव वर्मा यांनी जारी केला आहे. 

    आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार दीर्घकालीन रजेवर गेल्याने सध्या आयोगाचे सदस्य असलेले सतीश वाघोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश वाघोले हे विधी व न्याय विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले असल्याने अलीकडेच त्यांची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. 

    पारदर्शक कारभारासाठी सतीश बबन वाघोले यांची ख्याती असल्याने त्यांची अध्यक्षपदाच्या अतिरिक्त कार्यभाराची शिफारस राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे केली. 

   अकोले येथील साहित्यिक, संशोधक तसेच अगस्ती महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे यांचे सतीश वाघोले हे मेहुणे आहेत. 

   वाघोले यांच्या नियुक्तीबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त, माजी आमदार वैभव पिचड तसेच विश्वस्त मंडळ, कार्यकारिणीसह अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, साहित्यिक आणि निवृत्त प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, डॉ. सुनील शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.   —–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button