इतर

नेप्ती ग्रामपंचायतमध्ये महिलाराज सोनाली जपकर यांची उपसरपंच पदी निवड,

नेप्ती गावाच्या विकासासाठी कटीबद्ध – उपसरपंच सोनाली जपकर

अहिल्यानगर : प्रतिनिधी

– नगर तालुक्यातील नेप्ती ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा महिलाराज आले असून, उपसरपंचपदी सोनाली बंडू जपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच एकनाथ जपकर यांनी इतरांना संधी मिळावी यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेवर सरपंच सविता संजय जपकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

नेप्ती ग्रामपंचायतीत २०१६ मध्ये मिराताई संजय जपकर आणि वैजयंती ज्ञानेश्वर जपकर यांच्या माध्यमातून महिलाना नेतृत्वाला संधी मिळाली होती. त्यानंतर २०२६ मध्ये सरपंचपदी सविता जपकर, तर उपसरपंचपदी सोनाली जपकर यांची निवड झाल्याने ग्रामपंचायतीत पुन्हा महिलाराज प्रस्थापित झाले आहे.

नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली जपकर म्हणाल्या की, जनतेने मोठ्या अपेक्षा ठेवून माझी बिनविरोध उपसरपंच पदी निवड केली आहे . शासकीय योजनांचा लाभ गरिबाच्या घरापर्यंत पोहोचण्याचासाठी प्रयत्न करणार आहे . गावात सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करणार आहे. शिक्षण व लाईट या प्रश्नावर मी विशेष लक्ष देणार आहे.

गावातील विधवा व अपंग यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे . ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या विविध योजना राबवून गावाचा विकास करणार आहे . गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली बंडू जपकर यांनी केले.
सरपंच सविता जपकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली जपकर यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी उद्योजक संजय अशोक जपकर, माजी सरपंच मिराताई संजय जपकर, उपसरपंच संजय आसाराम जपकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पानसंबळ, पंचायत समिती सदस्य देवा होले, संचालक वसंत पवार, माजी उपसरपंच एकनाथ जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, चेअरमन उमर सय्यद, व्हॉइस चेअरमन रोहिणी होळकर ,ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद, बाबासाहेब होळकर, अनिता चौगुले, दादू चौगुले, नितीन कदम, विजय होळकर, संभाजी गडाख, सोमनाथ पुंड, विमल होळकर, भाऊसाहेब होळकर, बंडू जपकर, राजेंद्र जपकर, जालिंदर शिंदे, माजी सरपंच दिलीपराव होळकर ,सागर गाडेकर मयूर जपकर ,
करण जपकर, अजय जपकर, प्रा.गोपीनाथ होले वाजिद सय्यद , दिपक साळवे, आसाराम साळवे, अंबादास जपकर, मच्छिंद्र होळकर, राजाराम जपकर, अशोक जपकर, सुरेश कदम, सादिक पवार, प्रा. मल्हारी कांडेकर, प्रा. एकनाथ होले, बंडू कांडेकर, ज्ञानेश्वर जपकर, नंदू जाधव, अंबादास पुंड, अतुल जपकर, भागिनाथ जपकर, गोरख जपकर, अजय जपकर, विकास वाघ, दिनेश वाघ, संजय जपकर, भाऊ जपकर, जबाजी कर्डिले, बाळू कर्डिले, मच्छिंद्र जपकर, एकनाथ होळकर, बाबासाहेब लांडे, नाना जपकर, गोरख इंगोले, अमोल चौगुले, तुषार फुले ,दादा जपकर, सोमा जपकर, विजय जपकर, रावसाहेब जपकर, मच्छिंद्र जाधव, शिवाजी गाडेकर, राजेंद्र गाडेकर, शरद पवार, नितीन पवार, कारभारी जपकर, डॉ. भाऊसाहेब जपकर, रामदास जपकर, बाजीराव चत्तर, राजेंद्र चत्तर, गोविंद कर्डिले, शुभम जाधव, राहुल जरे, सागर जपकर, सुधाकर कदम, राजेंद्र होळकर, दत्ता कदम यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button