इतर

पहाटेच्या दुर्गादौडीमुळे कोतूळ (ता. अकोले) मध्ये उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण

कोतुळ प्रतिनिधी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओम साईराम प्रतिष्ठान व हिंदुत्ववादी संघटना यांच्यावतीने पहाटेच्या दुर्गादौडीमुळे कोतूळ (ता. अकोले) परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गा देवीचे दुसरे वर्ष आहे.
देवीचा जयघोष, भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणाऱ्या महिला व युवकांमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे.


पहाटेच्या सुमारास आयोजित करण्यात येणाऱ्या या दुर्गादौडीत महिला व युवकांसह नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. हातात भगवे
ध्वज घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गादौडीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होत आहे. देवीच्या जयघोषाने रस्ते दुमदुमत असून,नागरिकांकडूनही या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. दुर्गादौड हा केवळ धार्मिक उपक्रम नसून युवकांमध्ये शिस्त, संघभावना, व्यायामाची आवड आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम ठरत आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या युवकांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यासही मदत होत आहे.
जागोजागी भगव्या ध्वजाचे औक्षण व फुले उधळून या वडीचे स्वागत करण्यात येत आहे. ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्ते आणि युवक परिश्रम घेत असून, दरवर्षी या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या दुर्गादौडीमुळे कोतूळ परिसरात नवरात्रोत्सवाची रंगत वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button