माऊली वृद्धाश्रमा सारख्या सत्कार्यात सहभाग ही ईश्वरसेवाच : ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर

श्रीरामपूर दि 29 माऊली वृद्धाश्रम, जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रमा सारख्या सत्कार्यात सहभागी होणे ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवाच असून सुभाष वाघुंडे, कल्पनाताई वाघुंडे या परिवाराचे कार्य देवकार्यच होय, असे विचार ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.
श्रीगुरु माऊली सेवा संस्थेने २०१७ मध्ये माऊली वृद्धश्रमा चा प्रारंभ केला, यानिमित्त o९ व्या वर्धापनदिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रवचनसेवेत हभप आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी.ई. शेळके, नायब तहसिलदार राजेंद्र शिंदे, पत्रकार देविदास देसाई आदिसह मान्यवर उपस्थित होते. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर, मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात येऊन संतपूजन व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
याप्रसंगी माजी प्राचार्य टी.ई. शेळके, नायब तहसिलदार राजेंद्र शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, रज्जाकभाई पठाण, राजेंद्र कोहकडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसिलदार मिलिंदकुमार वाघ, डीवाय एसपी. देवदत्त भवर, नायब तहसिलदार राजेंद्र शिंदे आदिंचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे वाघुंडे यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र शिंदे यांनी वृद्धश्रमातील १६ रेशनकार्ड प्रदान केले. पुणे येथील कल्पनाताई चामे, जळगाव येथील लताताई येलजाळे, कोळपेवाडी येथील हभप बाबासाहेब वाबळे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,प्रा. शिवाजीराव बारगळ, महासीएनजी फेडरेशनचे अहिल्यानगर गोसेवा आयोगाचे सूरज सूर्यवंशी, प्रा. रामचंद्र राऊत, मातुलठाण येथील हभप दत्तात्रय महाराज शेळके आदिंनी आचार्य डॉ कांडेकर, सुभाष वाघुंडे परिवारांचा सन्मान केला. नगर आकाशवाणीचे उद्घोषक संतोष मते, पत्रकार बद्रिनाथ वढणे, सुरेश कर्नावट, हभप अकोलकर महाराज आदिंचा सत्कार करण्यात आला. क्रीडा व सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. मावनी तलवार, प्रिशा कुंकूलोळ, अर्ना कुंकुलोळ, तनिष्का राऊत, हित बाढ़िया, विजय क्षित्रे, शिवम पटारे, अस्लम इनामदार, सौरभ राऊत, अजित पवार, डॉ. संकेत मुंदडा, डॉ. राम कुकरेजा, गौरव डेंगळे, नितीन बलराज, केतन वाघ, राजेंद्र कोहकडे, शामराव पुरनाळे, डॉ. मदन सोमाणी, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. कल्पनाताई वाघुंडे, वंदना विसपुते, गौरी वाघुंडे, शिरीष वाघुंडे, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर आदिंनी नियोजन केले. संतोष मते यांनी सूत्रसंचालन केले तर कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.



