अगस्ती मंदिरातून ज्योत आणून जामगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

राजुर प्रतिनिधी
अकोले येथील अगस्ती ऋषींच्या मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून आणत तालुक्यातील जामगाव येथे रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अकोले तालुक्यातील अनेक गावांतील अखंड हरीनाम सप्ताहांची परंपरा खंडित झाली होती. मात्र कोरोनाचा जोर कमी झाला ,निर्बंध शिथिल झाले आणि अखंड हरीनाम सप्ताहांच्या माध्यमातून गावोगावी हरीनामाचा गजर सुरू झाला. यातीलच जामगाव हे एक खेडेगाव. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत येथे अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी सुरेश पथवे,अंकुश महाले, पंढरी पथवे,योगेश महाले,राजू काळू पथवे,दिलीप महाले,तेजस महाले,संदेश मुर्तडक, संदेश महाले,तेजस वंडेकर,साहिल महाले,सचिन महाले,विश्वास महाले,सागर शेळके,ऋतिक महाले,सतीश आरोटे, तेजस आरोटे ,नितीन महाले,नारायण आरोटे,विलास पथवे,सौरभ महाले, गोविंद महाले,संकेत गंभिरे,दत्तात्रय महाले, जितेंद्र महाले या तरुणांनी पायी दिंडी काढत अगस्ती ऋषींच्या मंदिरातून ज्योत पेटवून जामगाव येथे आणली.ज्योतीचे गावात आगमन होताच सुवासिनींनी ज्योतीचे पूजा केली.टाळ मृदुन्गाच्या गजरात ग्रामस्थ भजनी मंडळाने ज्योतीची गाव प्रदक्षिणा करत ग्रामदैवतांना ओवाळून येथील सप्ताहाला सुरुवात झाली. या काळात ह भ प दौलत महाराज शेटे,सुनीता ताई गजे,काजल ताई रंधे,दीपक महाराज देशमुख, विश्वनाथ महाराज शेटे,संदीप महाराज सावंत आणि कैलास महाराज आहेर यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
——–////——