सोनई त रामनवमी उत्सव साजरा !

आकर्षक विद्युत रोषणाई,
फुलांची सजावट,भाविकांची गर्दी, आणि ,भक्तांचा जल्लोष,!
सोनई- प्रतिनिधी
-सर्वत्र देशात राममंदिरचा प्रश्न चर्चेत असताना अयोध्येत राममंदिर पूर्णत्वास आहे,त्याचा जोश घेत आज रामनवमी मोठ्या उत्साहात, भक्तांच्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
युवा नेते उदयन गडाख मित्र मंडळाचे वतीने तरुण किरण चंदघोडे, बालू शहा,साहिल लिपाने,महेश शेटे,गणेश लोंढे, सनी परदेशी,दिनेश चव्हाण,आकाश गुरव,महेंद्र गडाख,रोहन गर्जे,आदीनी अयोध्या हुन आणलेल्या जलकलशाची व धर्मध्वजची पूजा करून महंत ह.भ.प.भास्कर गिरीजी महाराज,ना.शंकरराव गडाख यांनी स्वागत केले.
यावेळी रामझिरा येथील प्रगणातून मिरवणूकीस यवा नेते उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थिती त प्रारंभ झाला, राममंदिर व पेठेतील मंदिर आकर्षक विदुयुत रोषणाई व फुलांची सजावटीसाठी सज्ज झाली होती. श्री

प्रभूरामचंद्र की जय या जयघोषात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महिलांनी पाळणे, गीते म्हटली, मिरवणुकीत ,मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या वेळी प्रभूराम चंद्र सारखे कल्याणकारी, जीवन कार्याचे आदर्श व ध्येयवादी तत्वे आचरणात आणावे,असे ना.गडाख म्हणाले.ठीक ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

पहिल्यांदाच कोरोना नंतर भव्य असा रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र परिसर भगवेमय झाला होता.