आजचे पंचांग व राशिभविष्य दि १२/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २२ शके १९४४
दिनांक :- १२/०४/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४४,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २९:०३,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति ०८:३५,
योग :- शूल समाप्ति १२:०३,
करण :- वणिज समाप्ति १६:५२,
चंद्र राशि :- कर्क,(०८:३५नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०५प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३७ ते ०५:११ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३० ते ०२:०४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:११ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
कामदा एकादशी, श्रीकृष्ण दोलोत्सव, घबाड २९:०३ नं., भद्रा १६:५२ नं. २९:०३ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २२ शके १९४४
दिनांक = १२/०४/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल. संभाषण कौशल्य दाखवण्याचा योग्य येईल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील.
वृषभ
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. घरगुती कामाचा ताण जाणवेल.
मिथुन
भावंडांची मदत घेता येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. अधिकार्यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.
कर्क
कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातून चांगला धनलाभ संभवतो. किरकोळ गैरसमज दूर सारावेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
सिंह
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक अडचणीतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. अपचनाचा त्रास जाणवेल.
कन्या
काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.
तूळ
जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील. जुगाराची आवड पूर्ण कराल.
वृश्चिक
हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल. विरोधकांचा विरोध मावळेल अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक समाधान शोधा.
धनू
आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. सहकार्यांची उत्तम साथ मिळेल.
मकर
हातातील कामात किरकोळ अडचणी संभवतात. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा. जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल.
कुंभ
गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका. खिशाला कात्री लागू शकते. जोडीदाराचे मत विचारात घ्या. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा.
मीन
जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील. तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. कामातून समाधान मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर