आजचे पंचांग व राशिभविष्य दि १९/०४/२०२२

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २९ शके १९४४
दिनांक :- १९/०४/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:११,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४६,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २६:३९,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २५:३९,
योग :- व्यतीपात समाप्ति १७:०१,
करण :- बव समाप्ति २७:१६,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मेष – अश्विनी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ५नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३७ ते ०५:१२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:२८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२८ ते ०२:०३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:१२ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
अंगारक चतुर्थी (मुंबई चं.उ. २१:४५), दुसरी तीन, घबाड २५:३९ नं., भद्रा १६:३९ प., तृतीया श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २९ शके १९४४
दिनांक = १९/०४/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
संथ व साधा दिवस. मन थोडे उद्विग्न राहील.अष्टम चंद्र आहे. ईश्वरी उपासना बळ व यश देईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. कार्य क्षेत्रात विशेष लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम.
वृषभ
आज चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करीत आहे. मन थोडे नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळशुक्र धार्मिक आस्था वाढेल असे सुचवीत आहेत. दिवस बरा आहे.
मिथुन
आज शरीर शिथिल वाटेल. जास्त दगदग टाळा.नको असलेली काम गळ्यात येतील. मानसिक ताण येईल .आर्थिक बाजू सांभाळा. दिवस मध्यम.
कर्क
आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगलमय होईल. वाचन मनन कराल. संततीसुख मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम.
सिंह
आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. पितृ सुख मिळेल. दिवस आनंदात पर पडेल.
कन्या
तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. भावंडं भेट होईल. दिवस आनंदी आहे.
तुला
आज चंद्र आणि गुरू नवपंचम योग आहे आहे. आर्थिक भरभराट होईल घरात आनंदी वातावरण राहिलं. प्रकृती देखील उत्तम राहिलं. दिवस शुभ आहे.
वृश्चिक
आज राशी स्थानात चंद्र तणावमुक्त करेल.धार्मिक कार्यात मन गुंतून राहील. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस चांगला आहे.
धनु
आज व्यय चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा.राशीच्या द्वितीयात शनि आहे. क्लेश होतील. दिवस उपासनेत घालवा.
मकर
आज दिवस लाभदायक असून तुमच्यासाठी अनेक संधी घेऊन येईल. राशीतील शनि प्रवास योग आणेल. आईवडिलांची भेट होईल.आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम.
कुंभ
आज दिवस कार्य क्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे.यश मिळेल.आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. दिवस उत्तम.
मीन
आज भाग्यदायक आणि आनंदी दिवस आहे.सगळीकडून सुसंधी, लाभ, प्रवास, भेटीगाठी यात दिवस आनंदात निघून जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर