राळेगण थेरपाळ च्या काळ भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन!

.
खासदार सुजय विखे यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन
स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे काळ भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील विचारमंच आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा शनिवार दि. २३ व रविवार दि २४ एप्रिल २०२२ रोजी होत असून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत राळेगण थेरपाळ येथे होत आहे. या स्पर्धेचे आयोजन खासदार सुजय विखे यांचे समर्थक असलेले राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त आदर्श सरपंच पंकज कारखिले यांनी आयोजित केली असून शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा असलेला बैलगाडा शर्यत हा खेळ पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा घाट राळेगण थेरपाळ येथे भरवण्यात येत असून या शर्यती साठी सहभागी होणाऱ्या बैलगाड्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक बक्षीस २ लाख रुपये व फळी फोड गाड्यास चांदीचा बैलगाडा, द्वितीय क्रमांक बक्षीस १ लाख रुपये व फळी फोड गाड्यास चांदीचा बैलगाडा, तृतीय क्रमांक बक्षीस ५० हजार रुपये व फळी फोड गाड्यास चांदीचा बैलगाडा, घाटाचा राजा ठरणाऱ्या बैलगाड्यास सोन्याची अंगठी तसेच आकर्षक फायनलसाठी पहिल्यात पहिला बुलेट गाडी, पहिल्यात दुसरा स्प्लेंडर गाडी अशा पद्धतीने स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा मालकांनी आपल्या बैलगाड्या समवेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राळेगण थेरपाळ येथे आकर्षक अशा स्वरूपाची ही बैलगाडा स्पर्धा होत असून खासदार सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद सदस्य व दूध संस्थेचे मा. अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य निघोज सचिन पाटील वराळ, जवळा पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत पठारे तसेच राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले मित्रपरिवार व जाणता राजा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बैलगाडा घाट रविवार दि. २३ रोजी सकाळी ०८ वाजता सुरू होत आहे. या संपूर्ण बैलगाडा शर्यतीचे थेट प्रक्षेपण युट्यूब वरुन करण्यात येणार आहे.
स्पर्धा कालावधीमध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व बैलगाडा शौकीनांची जेवणाची व्यवस्था उदय विद्यालय प्रांगणात राळेगण थेरपाळ येथे करण्यात आलेली आहे. दरम्यान संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. बैलगाडा शौकीन ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक असून राळेगण थेरपाळ येथे भरणारी ही स्पर्धा जिल्ह्यात आकर्षण ठरणार आहे.
या भव्य दिव्य होत असलेल्या बैलगाडा स्पर्धेसाठी राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थ तसेच लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांना केले आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.
बैलगाडा स्पर्धा ठरणार जिल्ह्यात आकर्षण..
नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून राळेगण थेरपाळ येथे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी भव्य बैलगाडा शर्यत भरवली असून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये आकर्षण ठरणार असून राज्यातील बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीन ही स्पर्धा पाहण्यासाठी इच्छुक आहेत. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा राळेगण थेरपाळ येथे होत आहे.