
सोनई–प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील ना.शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली खेडलेपरमानंद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची सन-२०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीची निवडणूक मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानापाटील तुवर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली.
१३ जाग साठी बिनविरोध निवड झालेले संचालक सुभाष दशरथ राजळे, बादशहा बुऱ्हाणभाई इनामदार,सीताराम बाजीराव रोठे,महमंद उस्मान इनामदार,शहाराम विठ्ठल राजळे,संतोष सोमनाथ तुवर,फकिर महमंद फत्तुभाई हवालदार,सूर्यकांत रखमाजी तुवर,चंद्रकला कोंडीराम राजळे,वछलाबाई दत्तात्रय राजळे,नानासाहेब पोपट केदारी,सुजित प्रभाशंकर तुवर, सीताराम सोपान सरोदे,यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल विविध स्तरावर अभिनंदन केले आहे.
या निवडणुकी कामी मुख्य निवडणूक अधिकारी एम.एच.शेख, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव आप्पासाहेब बोर्डे, यांनी काम पाहिले.नवनिर्वाचित संचालकांचे जेष्ट नेते यशवंतराव गडाख,जिल्हा परिषदेचे बांधकाम व पशुसंवर्धन चे सभापती सुनील गडाख,पंचायत समितीचे माजी सभापती सुनीता गडाख,युवा नेते उदयन गडाख ,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.