माका, महालक्ष्मी हिवरे, चांदा ,गावांत उन्हाळी सोयाबीन चा यशस्वी प्रयोग!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील घोडेगाव मंडळात माका, चांदा, महालक्ष्मी हिवरे या गावांमध्ये उन्हाळी सोयाबीन चा प्रयोग यशस्वी ठरला आहे

घोडेगाव कृषी मंडळातील माका, महालक्ष्मी हिवरे चांदा, आदी गावांमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी सोयाबीन या तेलवर्गीय पिकांचा प्रथमच प्रयोग करण्यात आला आणि तो पूर्ण यशस्वी झाला असे प्राथमिक पाहणीत समोर आल्याचे कृषी सहाय्यक श्री आर ही पवार यांनी म्हटले आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे प्रक्षेत्र भेटी चे आयोजन करणे आणि शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून त्यांचे आर्थिक उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचे काम कृषी विभाग नेवासा करत आहे
महालक्ष्मी हिवरे गावचे मा सरपंच भगवानराव गंगावणे यांनी आपल्या शेतात पाच एकर फुले संगम वाणाची पेरणी केली असून पीक अतिशय जोमदार आले आहे प्रति झाड सुमारे 80 ते 110 शेंगा लगडलेल्या दिसून येतात की पेरणीच्या योग्य वेळ ही 15 डिसेंबर ते 10 जानेवारी योग्य आहे त्याचबरोबर योग्य पाणी आणि खतांचे नियोजन केल्यास ऊस या पिका पेक्ष्या कमी कालावधी अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून भविष्यात सोयाबीन कडे शेतकऱ्यांनी पहावे असे आवाहन करण्यात आले योग्य मार्गदर्शनासाठी त्यांनी कृषी सहाय्यक श्री रुपेश पवार आणि कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने चे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर श्यामसुंदर कौशिक व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे तज्ञ यांचे वेळोवेळी प्रक्षेत्र भेटी व मार्गदर्शन लाभले असे श्री गंगावणे यांनी सांगितले
