अहमदनगर

कळसुबाई देवीच्या यात्रेनिमित्त डांगी जंनावरांचे प्रदर्शन संपन्न !

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून प्रसिद्ध असणा-या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या जहागिरदार वाडीत कळसुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य असे डांगी जंनावरांचे प्रदर्शन संपन्न झाले असुन परीसरातील शेतक-यांनी या प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .
अकोले तालुक्यातील जहागिरदार वाडी येथे दरवर्षी कळसुबाई देवीची यात्रा भरविली जाते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षांपासुन या यात्रेला खंड पडला होता .पंरतु यावर्षी कोरोनाचे सावट दुर झाल्याने यात्रेबरोबरच परिसरातील आदिवासी शेतक-यांच्या डांगी जनावरांचे भव्य असे प्रदर्शन जहागिरदार वाडी येथील गावकरी बंधुनी आयोजित केले होते . या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे , माजी उपसभापती मारुती मेंगाळ , बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांच्यासह परिसरातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते झाले .तर देवीच्या यात्रेच्या मिरवणुकीत तालुक्याचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी सहभाग नोंदविला . जनावरांच्या डांगी प्रदर्शनात अकोले तालुक्यासह ईगतपुरी तालुक्यातीलही आदिवासीं शेतकरी आपल्या पाळीव जनावरांसह हजर झाली होती . या प्रदर्शनात विठ्ठल सोमा गंभिरे , भाऊसाहेब कचरु भोसले , कुंडलिक श्रावणा खाडे , विष्णु शंकर बांडे , वासुदेव विष्णु आडोळे , भाऊसाहेब देवराम कोकाटे , करण भाऊसाहेब भोसले यांच्या जनावरांनी वैयक्तिक पातळीवर नंबर प्राप्त केले . यात्रेसाठी व प्रदर्शनासाठी राजौर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह पो. काॅ. दिलीप डगळे , अशोक काळे , विजय मुंढे , विजय फटांगरे व सहका-यांनी चोख बंदोबस्त बजावला .यात्रा व प्रदर्शन व्यवस्थित पार पडावे यासाठी गावचे सरपंच वैशाली हिरामण खाडे , पो.पा नामदेव सोमा खाडे व यात्रा कमिटी सदस्यांनी अखंड परिश्रम घेतले .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button