…तर पिंपळगाव खांड चे पाणी पळविणाऱ्यांना मुळेचा दणका दाखवू! संघर्ष समितीचा इशारा

अजितदादांकडे बैठक घेऊन मार्ग काढू
– सीताराम पाटील गायकर
कोतुळ प्रतिनिधी
पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पळविणाऱ्यांना मुळे चा दणका दाखवु असा इशारा पिंपळगाव खांड धरण पाणीबचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला
पिण्याच्या पाणी योजनांच्या नावाखाली पिंपळगाव खांड धरणातून पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा निषेध करण्यासाठी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज पिंपळगाव खांड धरण स्थळावर प्राथमिक बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या
यावेळी भाऊसाहेब बराते संजय साबळे, बाळासाहेब शेळके ,कैलास शेळके ,प्रभाकर फापाळे, सखाराम लांडे, योगेश गोडसे,डॉ एस के सोमण ,डॉ दामोदर सहाने, रविंद आरोटे, सुदाम डोंगरे , प्रा मच्छिन्द्र देशमुख, विजय जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विकास शेटे यांनी सूत्र संचालन केले तर भाऊसाहेब शेटे यांनी आभार मानले
पठार भागातील गावासाठी पाणी योजनांच्या सर्व्हे साठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या साहित्याची तोडफोड करून त्यांना हाकलून लावू असा इशारा पिंपळगाव खांड चे सरपंच विजय जगताप यांनी दिलातर पाण्यावाचून तडफडुन मारण्यापेक्षा आम्ही पिंपळगाव खांड धरणात उडी घेऊन आत्महत्या करू असा इशारा पांगरीचे सुदाम डोंगरे यांनी यावेळी दिला
, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख आणि बी जे देशमुख यांनी आमदार डॉ किरण लहामटे यांचेवर तोफ डागली ,आमदारांनी जनतेच्या मताचा आदर व विचार करावा पठाराला पाणी देताना परिसरातील जनतेचे मत जाणून घेणे आवश्यक होते मात्र त्यांनी तसे केले नाही असा आरोप केलात्यांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही परंतु आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये त्यांनी पिंपळगाव खांड धरणाचे खाली अनेक साईट आहे त्या ठिकाणी दुसरे बंधारे केटी निर्माण करावे त्यातून पठार भागाला पाणी द्यावे त्याला आमचा विरोध नाही असे सांगितले
शेतकरी नेते दशरथ सावंत यावेळी म्हणाले की -बदल हा जनतेच्या रेटातूनच होतो जनतेचा हा प्रश सोडविण्यास एकजुटीने जन आंदोलन उभे करावे या साठी मी पुढे राही लआयत पाणी नेऊ नका दुसरा बंधारा के टी बांधा त्यातून पाणी न्या पण हक्कच पाणी जाऊ देणार नाही असा निर्धार केला पाहिजे जनतेची ताकद दाखवावी लागेल खरे तर मुळा नदीवर आणखी एक टीएमसी पाणी आडविण्याची गरज आहे असे सावंत म्हणाले
यावेळी नारायण डोंगरे शरद चौधरीं, शिवाजी वाल्हेकर सुभाष घुले ,रोहिदास भोर रमेश देशमुख ,डॉ एस के सोमण ,चंद्रकांत घाटकर, कैलास डोंगरे नारायण डोंगरे प्रल्हाद देशमुख,आत्माराम शेटे अर्जुन गावडे, भाऊसाहेब शेटे,लहानु फापाळे आदी उपस्थित होते-
