
नगर-कल्याण रोडवर दुचाकी स्वाराला तिघांनी लुटले
पारनेर प्रतिनिधी :
नगर-कल्याण रोडवर ड्रीम सिटी जवळ मोटारसायकलस्वाराला मारहाण करुन लुटल्याची घटना रविवारी (दि. १५) पहाटे घडली आहे.
भाळवणी येथील शेतकरी गेणू तुळशीराम रोहोकले हे कामानिमित्त नगरला आले होते. ते पुन्हा भाळवणीकडे जात असताना शनिवारी (दि. १४) मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास ते ड्रिमसिटीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी तेथे अज्ञात ३ इसम आले व त्यांनी अचानक रोहोकले यांना मारहाण सुरू केली. रस्त्यापासून जवळ असलेल्या मोकळ्या जागेत नेवून तिघांनी लाथा-बुक्क्यानी मारहाण करुन त्यांच्या खिशातील मोबाईलफोन, रोख रक्कम असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या बाबत रोहोकले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.