इतर

शालेय प्रशासन संकलीत मार्गदर्शिका या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन

सोनई प्रतिनिधी
शाळा कॉलेजेसमधील कार्यालयीन प्रशासनावर अधारीत सर्व संदर्भासह श्री. पाराजी मोरे जिल्हा अध्यक्ष पुरोगामी शिक्षकेतर संघटना अहमदनगर यांचे संकल्पणेतून अद्ययावत केलेल्या “शालेय प्रसासन संकलीत मार्गदर्शीका” या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यीक मा. यशवंतरावजी गडाख यांचे शुभहस्ते व नाशिक विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या
प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले.


सोमवार दि. १६ मे या बुद्धपोर्णीमच्या मुहूर्तावर सकाळी १० वाजता आमराई गेस्टहाउस येथे हा प्रकाशन सोहळा सरस्वती, गौतमबुद्ध व संत ज्ञानेश्वरांच्या मुर्तीसमोर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सुरू करण्यात आला. गडाख साहेब यांनी पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करताना शिक्षण क्षेत्रातील उनिवा दुर करून शिक्षणाचा दर्जा सुधारणेबाबत व सुसंस्कारीत पीढी घडवण्याबातचा मोलाचा सल्ला शिक्षण क्षेत्रातील उपस्थीतांना दिला. शिक्षण संस्था चालवताना प्रशासनात शिस्त असावी लागते व त्यासाठी अशा मार्गदर्शीका निश्चितच उपयोगी ठरू शकतात हे अधोरेखीत करून पुरोगामी शिक्षकेतर संघटनेने केलेला मार्गदर्शीकेचा हा प्रयोग अभिनंदनास पात्र आहे . अनेक शासन निर्णयांचा अभ्यास करून हे पुस्तक तयार केलेले आहे सर्व विद्यालयांचे प्रमुख ,
लिपीक यांनी दैनंदीन कामकाजासाठी हे पुस्तक संग्रही ठेउन त्यानुसार कार्यवाही केल्यास अनेक समस्या दुर होउ शकतील असे प्रतीपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार सुधिर तांबे यांनी पुस्तकाचे महत्व विषद करतानाच शिक्षण क्षेत्रातील चालू अनेक
घडामोडींवर भाष्य केले शासनाकडुन अनेक चुकीचे शासन निर्णय पारीत होत असल्याने मंत्रालयात दोष दुरूस्तीसाठी संघटना व सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची होणारी गर्दी वाढत असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत चिंता व्यक्त केली. शासन एकच असले तरी सेवासवलती देताना विभागाविभागत दुजाभाव केला जात आहे हे नमुद . आदर्श नागरीक घडवायचे असतील तर शिक्षणक्षेत्रात नियोजित पद्धतीने अधिक गुंतवणूक होण्याची गरज असल्याचे व सुनियोजीत शिक्षण प्रणाली विकसीत करण्याची गरज असल्याचे
त्यांनी सांगीतले. शालेय कामकाजात प्रकाशीत झालेल्या या पुस्तकाचा वापर अत्यंत गरजेचा आहे असेही सांगीतले. सध्या समाजापुढे अनेक ज्वलंत प्रश्न असताना प्रार्थणा व भोंग्यासारखे विषय समोर येत आहेत याबद्दल चिंता व्यक्त केली.
अहमदनगर पुरोगामी शिक्षकेतर संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. समशेरजी पठाणसर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतानाच शालेय कामकाजातील एकूण ३८ विषयांवर यापुस्तकामध्ये मार्गदर्शनपर माहीती दिलेली असुन २७० पेजेसचे हे पुस्तक शैक्षणीक संस्था व त्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे नमुद केले. पुस्तकाचे स्वागत मुल्य ना नफा ना
तोटा या तत्वावर रू. २३०/- असल्याचे सांगतले. पुस्तक तयार करण्याचे सर्व श्रेय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. मोरे पी. डी. यांचेच आहे असे सांगीतले. जिल्हा शिक्षणाधीकारी मा. कडूस सो. यांनी यापुस्तीकेची अत्यंत गरज होती व हीच आपेक्षा शिक्षण आयुक्त
यांनीही व्यक्त केल्याचे नमुद करून जुनपुर्वी संपुर्ण जिल्हयात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून मुख्याध्यापक व लिपीक यांना प्रशिक्षण देण्यासाठी या मार्गदर्शीकेचा व संघटनेतील प्रशिक्षकांचा उपयोग करून घेतला जाईल असे जाहीर केले. या प्रसंगी संकलक
श्री. मोरे पी. डी. सर शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष मा. सुरासेसर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीतसर , शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदेसर, मुळा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव मा. यु. एम. लोंढेसर यांचीही भाषणे झाली.
या शाही थाटातील प्रकाशन समारंभास महाराष्ट्रभरातून अनेक पुस्तकप्रेमी , पुणे येथील ज्ञानकुभ मासीकाचे संपदक . विनायकराव कुलकर्णी, शिक्षक संघटनेचे मा. उद्धवराव सोनवणे, मा. सुनिल दानवे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनेक शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य व स्थनीक नागरीक उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सतिष सावंत व श्री. योगेश रासने यांनी केले तर आभार श्री. भाउसाहेब पेटकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button