भाजप धर्मांधतेच्या अडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भारत आहे !कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे

….
अकोले प्रतिनिधी
भाजप आपला धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी देशात धर्मांध विष पेरत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे नफे वाढविण्यासाठी जनतेचे शोषण वाढविले जात आहेजनतेच्या शोषणाविरोधात व वाढती बेरोजगारी, बेकारी, दारिद्र्य व कंगालपणाच्या विरोधात असंतोष भडकू नये यासाठी जनतेचे लक्ष या मूलभूत मुद्यांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांध मुद्दे नियोजनबद्धपणे पुढे रेटले जात आहेत. हनुमान चालीसा, अयोध्या, हिजाब, हलाल सारखे मुद्दे या धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापरले जात आहेत. देशात आदिवासी, दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील हिंसाचार वाढत आहे. देशातील या दूषित वातावरणाचा निपटारा करण्यासाठी जनतेची व्यापक एकजूट उभी करावी लागेल. धर्मनिरपेक्ष शक्तीची एकजूट आणखी वाढवावी लागेल व आर्थिक प्रश्नाबरोबरच सामाजिक अन्याय व अत्याचारांच्या मुद्यांवर जोरदार संघर्ष उभारावे लागतील. असे प्रतिपादन माकपचे पॉलीट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील पक्ष सभासदांसाठी आयोजित अभ्यास शिबिरात ते बोलत होते.
अकोले येथील माकप पक्ष कार्यालयात माकपच्या निवडक 150 सभासदांसाठी पक्षाच्या वतीने अभ्यास शिबीर आयोजित केले होते. अकोले, संगमनेर, राहुरी व कोपरगाव तालुक्यातून प्रतिनिधी यावेळी शिबिरासाठी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आरपारचे संघर्ष उभे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शिबिरासाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, नंदू गवांदे, राजू गंभीरे, शिवराम लहामटे, प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड, संगीता साळवे, जुबेदा मणियार, सुनीता काळे, आराधना बोऱ्हाडे, गणपत मधे, साहेबराव घोडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.