इतर

शिबीरातून विदयार्थ्यांना दिले वन्यप्राणी गणने चे प्रशिक्षण

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी

वन्यजीव विभाग भंडारदरा व सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीय सेवा योजना व डाॅ.डी.वाय.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने बौध्द पौणिर्मेचे औचित्य साधुन वन्यजीव प्राणीगणना शिबीराचे आयोजन रतनवाडी कळसुबाई हरिषचंद्रगड अभयारण्य येथे करण्यात आले होते.
वनविभाग यांच्या वतीने दरवर्षी बौध्द पौर्णिमेला प्राणी गणना केली जाते. दिवसेंदिवस निसर्ग, निसर्गाच्या सानिध्यात असणारा अधिवास यांचा होणारा -हास हा विशय अतिषय गंभीर बाब बनला आहे. आणि या सर्वांचा विचार करता या निसर्ग संवर्धनाची आवड विद्यार्थ्यां मधे निर्माण व्हावी तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहणा-या वन्य प्राण्यांचे, अन्नसाखळीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी कळावे हा उद्देष डोळयासमोर ठेवून या शि बीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात विदयापीठा अर्तंगत येणा-या महाविदयालयांमधील 206 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी कळसुबाई अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, जेष्ठ पत्रकार मिलींद बेंडाळे वनपाल मनिशा सरोदे, तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ.मोहन वामन उपस्थित होते. मनोगत व्यक्त करत असताना मा.अमोल आडे यांनी महाविदयालयाच्या निसर्गसंवर्धनासाठीच्या उपक्रमांचे कौतूक केले. व तरूणपिढीचा निसर्गसंवर्धनात सहभाग याचे महत्त्व पटवुन सांगितले.
शिबीरप्रसंगी पहिल्या सत्रात विदयाथ्र्यांना वन्यजीवगणना करताना घ्यावयाची काळजी प्राणी संघर्श या विशयावर मिलींद बेंडाळे यांनी मार्गदर्षन केले.
बौध्द पौर्णिमेच्या दिवषी होणा-या प्राणीगननेसाठी घाटघर, घाटणदेवी, गणेषतलाव, वाघतळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मचान बांधण्याची पद्धती याचे प्रषिक्षण देण्यात आले.
बौध्द पौर्णिमेला ठराविक वन्यजीवगणनेची माहीत असणा-या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्राणीगणनेचा अनुभव घेता आला. यात ससा, रानडूक्कर, रानकांेबडया, भेकर, मोर हे प्राणी आढळुन आले.
सदर शिबीराचे आयोजन डाॅ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष मा.डाॅ.पी.डी.पाटील उपाध्यक्ष मा.डाॅ.भाग्यश्रीताई पाटील,सचिव मा.डाॅ.सोमनाथ पाटील, विष्वस्त मा.डाॅ.स्मिता जाधव तसेच महाविदयालयांचे प्राचार्य डाॅ.मोहन वामन, यांच्या मार्गदर्षनाखाली करण्यात आले तर शि बीराच्या आयोजनात प्रा.गणेष फुंदे डाॅ.मिनल भोसले, प्रा.खालीद ,षेख, प्रा.भागवत देसले,प्रा.सतीष ठाकर, प्रा.राधाकृश्ण ठाणगे, प्रा.चेतन सरोदे, प्रा.रोहीत वरवडकर यांनी सहभाग नों दवला. तसेच रतनाडीचे ग्रामस्थांनी स्वता उत्सुकपणे आयोजनासाठी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button