आजचे पंचांग व राशिभविष्य दि. २१/०५/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ३१ शके १९४४
दिनांक = २१/०५/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.
वृषभ
नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.
मिथुन
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.
कर्क
भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अतीविचार करण्यात वेळ वाया जाईल.
सिंह
लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वात विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.
कन्या
इतरांचा विश्वास संपादन करावा. अतीव्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
तूळ
स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.
वृश्चिक
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.
धनू
इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अतीकाटकसर करून चालणार नाही.
मकर
चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.
कुंभ
मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हित शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.
मीन
मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ३१ शके १९४४
दिनांक :- २१/०५/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५७,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १५:००,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति २३:४६,
योग :- शुक्ल समाप्ति ०८:११, ब्रह्मा २९:२१,
करण :- विष्टि समाप्ति २५:५६,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:११ ते १०:४८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:३३ ते ०९:११ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:४१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४१ ते ०५:१९ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
धनिष्ठा नवकारंभ २३:४६, मिथुनायन ०६:५२, षष्ठी-सप्तमी श्राद्ध, भद्रा १५:०० नं. २५:५६ प.,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸