नेवासा तालुक्यात घरगुती गॅस चा दुरुपयोग ,प्रशासनाचे दुर्लक्ष

दत्तात्रय शिंदे_ माका प्रतिनिधी_
प्रशासनाचा अंकुश नसल्याने नेवासा तालुक्यात घरगुती गॅसचा प्रचंड काळाबाजार होत आहे सर्वसामान्य नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघर गॅस देण्याचे धोरण घेतले मात्र घर देण्याचे हे धोरण व्यावसायिकांच्या हिताचे ठरले आहे
नेवासे तालुक्यात सर्वत्र चहा,मिठाई हाॅटेल,ढाबे तसेच चारचाकी वाहने चालवण्यासाठी,घरगुती गॅस चा वापर केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे व्यवसाय जास्त पेक्षा घरगुती गॅस कमी दराने असल्याने व्यवसायिक लोक घरगुती गॅस चा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे वास्तविक पाहता घरगुती जास्त व्यावसायिक कारणासाठी वापरता येत नसतानाही नेवासा तालुक्यात सर्वत्र घरगुती गॅसचा वापर होत आहे यामुळे सार्वजनिक ठिकाणे गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठा दुकाने ही धोक्याची केंद्र बनत आहेत प्रशासन याकडे डोळेझाक पण पहात असल्याने हा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे महसूल पुरवठा खाते याकडे लक्ष देईल की नाही असा सवाल केला जात आहे,
, केंद्रसरकारने मोफत घरगुती गॅस वाटप केले आज याच गॅस सिलिंडरचा उपयोग अनेक जण खाजगी चारचाकी वाहनांत प्रवासासाठी तर,काही ठिकाणी हाॅटेल दुकानात सरसकट व्यावसायिक कारणा साठी गॅस सिलिंडरचा वापर वापर केला
जात असल्याचे आढळून येत सध्यातरी यामुळे सर्वसामान्यांना असलेल्या घरगुती गॅसच्या अशा वापराने सामान्य जनतेचा जीव धोक्यात घातला जात आहे यावर नियंत्रण करणारी, प्रशासकीय यंत्रणा याबाबत कुचकामी ठरत आहे