
शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मौजे भातकुडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र.०३ असणाऱ्या गुंफा येथील नागरिकांची गेल्या काही वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. हि होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तातडीने सोय करावी अन्यथा ग्रामस्थ आपल्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करतील अशा आशयाचे निवेदन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जनशक्ती उद्योग आघाडीचे प्रमुख अशोकराव ढाकणेसह गुंफा येथील महिलांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.महेश डोके साहेब यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, मौजे गुंफा हा भाग भातकुडगाव वार्ड क्र.३ च्या अंतर्गत येतो. गुंफा वस्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी दोन योजना उभा करण्यात आल्या होत्या. पहिल्या योजनेअंतर्गत भातकूडगाव पासून गुंफापर्यंत पाण्याची पाईप लाईन करण्यात आली होती. परंतु फक्त कामाचे उदघाटन झाले त्यातून अद्याप पर्यंत पाणी आलेच नाही. दुसरी योजना खामगाव शिवारापासून गुंफा पर्यंत पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचे देखील उदघाटन झाले परंतु उदघाटन होऊन चार ते पाच वर्ष झाले तरी या योजनेचे पाणी आले नाही. या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी वर्षभर जारचे पाणी विकत घ्यावे लागते. गावामध्ये बोर आहे परंतु त्या बोरचे पाणी कडू आणि खारट असल्यामुळे पिण्यासाठीच काय पण वापरण्यासाठी देखील योग्य नाही.
निवेदनावर अकबर शेख, आबासाहेब काकडे, राम विखे, ज्योती काळे, उज्वला साबळे, सुनीता तागड, अश्राबाई खंडागळे, वर्षा पोपळघट, वैशाली दळे, सविता दळे, सिमा आहेर, सुनिता ससाणे, संगिता बर्डे, आबासाहेब आठरे, राजेंद्र उभेदळ, विठ्ठल चोरमारे, नवनाथ फटांगरे, सर्जेराव नजन, सुर्यकांत देशपांडे आदिंसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.