क्राईम

पाथर्डी तील देवराई येथील हाणामारीतील   १० आरोपिंचा  थरारक पाठलाग करत पकडले

पाथर्डी प्रतिनिधी

निवडणुकीत झालेल्या प्रभावातून विजयी मिरवणुकीत हला हला हल्ला करून एकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीना पाथर्डी पोलिसांनी १० आरोपीना थरारक पाठलाग करत ताब्यात घेतले

पाथर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ५५९/२०२२ भा.दं.वि कलम ३०२, ३०७, ३२६, ३२४, ३२३, ३३७, २४२.२४७, १४८, १४९,१२० (ब) सह आर्म ॲक्ट कलम ४/२५ सह महा. मालमत्ता विरूपणास प्रतिबंध कलम ७ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दि. १८ जून २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास विजयी पॅनल श्री बालाजी शेतकरी विकास मंडळ पॅनलची  मिरवणूक चालु असतांना १५ ते २० लोकांनी देवराई सहकारी सोसायटी निवडणुकमध्ये पराभूत झाल्याचे कारणावरुन  त्यांचेवर  तलवार, सुरा, लोखंडी कुन्हाड लाकडी दांडके, काठ्या घेवून येथून त्यांचेवर हल्ला केला. 

या हल्ल्यात अजय गोरक्ष पालवे याचा खून झाला व इतर लोक गंभीर जखमी झाले,  बाळासाहेब नवनाथ पालवे, (वय ४०, रा. देवराई ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर सध्या रा. एक्सप्रेशिन जवळ, पाथर्डी फाटा, नाशिक ता. जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर देवराई परिसरात मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.  तेथील ग्रामस्थांनी अहमदनगर ते तिसगांव जाणारे नॅशनल हायवे ६१ वर  रस्तारोको केला होता.

घटनेनंतर आरोपीची माहीती काढून पोलिसांनी  अतिशय थरारकपणे त्यांचा पाठलाग केला. विविध ठिकाणी सोनई पोलीस ठाणे,शनीशिंगणापूर पोलीस ठाणे, शेवगाव पोलीस ठाणे आणि नेवासा पोलीस ठाणे यांच्या मदतीने वेळीच नाकाबंदी केली. दरम्यान कालावधीत पाथर्डी पोलीस ठाणे यांनी गुन्ह्यातील  आरोपी सुनिल एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे यांना शिताफीने पकडले. तसेच गुन्ह्यातील इतर आरोपी हे त्यांचे ताब्यातील फॉर्चूनर गाडी (एमएच. १६ बी. झेड. ३१३१) याने भरधाव वेगाने तिसगाव येथून मिरी माका, देडगाव, कुकाणा, नेवासा या मार्गाने पळून जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन मुंडे यांनी त्यांचे पथकासोबत (शासकीय वाहन) आणि पाथर्डी  पालीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी त्यांचे पथकासोबत (शासकीय वाहनाने) तसेच गोपनीयचे पोकॉ भगवान सानप यांनी खाजगी वाहनाने साधारण दोन तास फॉर्च्यूनर गाडीचा  थरारक पाठलाग करत असताना नेवासा पोलीस पथकाने गाडीस नेवासा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले.

फॉर्च्यूनर गाडीमधून पोलीसांनी संजय विष्णु कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे यांना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या पथकाने अक्षय संभाजी पालवे यास ताब्यात घेतले.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो.नि सुहास चव्हाण, सपोनि कायंदे, सपोनि वाघ, पोउपनि डांगे, गोपनीयचे भगवान सानप, पोना अनिल बडे, पोना नवगीरे, पोहेकॉ दळवी, पोहेकॉ चव्हाण, पोना इश्वर गर्जे, सफौ पवार, सफौ कराड, चालक किशोर पालवे, तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करे, पोना राहुल यादव, पोहेकॉ तोडमल, पोकाॅ गुंजाळ, पोकॉ गलधर,  पोकॉ म्हस्के, शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी व त्यांचे पथक, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि चौधरी व त्यांचे पथक आणि शनीशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्पे व त्यांचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोकाॅ विकी पाथरे आणि पथक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कटके व त्यांच्या पथकांनी खुनातील आरोपींना ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button