वडगाव सावताळ येथे आधार कार्ड वाटप; गुणवंत विद्यार्थी सन्मान

भाऊसाहेब शिंदे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ नेते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबवले जात आहेत. गेल्या एक महिन्यापूर्वी वडगाव सावताळ गावातील आदिवासी गरीब समाजासाठी मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्पचे आयोजन भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कॅम्पचा लाभ ३०० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी घेतला. या योजनेच्या माध्यमातून अनेकांना फायदा झाला. भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम वडगाव सावताळ सारख्या आदिवासी भागामध्ये राबविण्यात आला होता. शुक्रवारी या आदिवासी गरीब बांधवांना नोंदणी व दुरुस्ती झालेले आधार कार्ड ज्येष्ठ नेते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे व वरिष्ठ सहाय्यक डाक अधीक्षक अहमदनगर पश्चिम संदीप हदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम वडगाव सावताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पाडला. यावेळी वडगाव सावताळ येथील होतकरू गरीब हुशार इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार व सन्मान करण्यात आला. हा सन्मान करून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागामध्ये अनेक हुशार गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना सन्मान व सत्कार करत शिंदे मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे म्हणाले वडगाव सावताळ सारख्या आदिवासी भागामध्ये काम करत असताना आदिवासी गरीब सर्वसामान्य लोकांसाठी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो आधार कार्ड हे निमित्त आहे परंतु अशाच प्रकारच्या अनेक विविध शासकीय योजना तसेच सामाजिक उपक्रम सर्वसामान्य आदिवासी शेतकऱ्यांच्या दारात घेऊन येण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल तसेच आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून त्यांना नेहमी मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
आधार कार्ड वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे वडगाव सावताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच परिषदेच्या अहमदनगर जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे, मा मुख्याध्यापक भाऊसाहेब खामकर मा. चेअरमन सर्जेराव रोकडे गो. या. रोकडे गुरुजी गुलाब शिंदे अनिल गायकवाड, भाजपा पारनेर तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश रोकडे, योगेश शिंदे धनंजय शिंदे अर्जुन रोकडे मंगेश रोकडे सतिश गायकवाड बाबासाहेब लोखंडचूर बाजीराव पवार भाऊसाहेब शिंदे राजेंद्र रोकडे कुणाल शिंदें संदीप खंडाळे मेहेर बाबा माध्यमिक विद्यालय वडगाव सावताळ मुख्याध्यापक संग्राम झावरे सर गुलाब रोकडे रवींद्र शिंदे संदीप निकम बबनराव रोकडे नामदेव रोकडे संपत रोकडे आप्पासाहेब तिखोळे धोंडीबा तिखोळे विकास रोकडे भाऊ जांभळकर निवृत्ती शिंदे भाऊ शिंदे सुनील शिंदे अशोक पवार विजय पवार रोहिदास पवार अक्षय रोकडे गोरख वाणी पोपट रोकडे सुमित रोकडे आदी ग्रामस्थ मान्यवर तसेच गावातील विविध क्षेत्रातील तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
..