हिवरे महालक्ष्मी कृषी दुतांकडून बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व मार्गदर्शन …

दत्तात्रय शिंदे/माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील हिवरे महालक्ष्मी येथे सोनई कृषी महाविद्यालयातील कृषिदूत यांचे आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली.
कृषी महाविद्यालय सोनई अंतर्गत ग्रामीण कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्राचार्य डॉ.एच.जी.मोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एन दरंदले व प्रा.खाटीक सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत डोंगर ऋषिकेश, गोंदवले सुरज, देशमुख कैवल्य, गांगर्डे विशाल, जाधव सौरभ व अशोक खराडे यांनी हिवरे महालक्ष्मी गावात शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेची माहिती व मार्गदर्शनाची मोहीम राबवली.
बीजप्रक्रिया म्हणजे काय, बीजप्रक्रियेचे फायदे, उत्पादन वाढीवर परिणाम, गुणवत्ता वाढ, आजारांवर नियंत्रण कसे होते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कार्यक्रमाच्या वेळी कृषी सहाय्यक श्री.आर.पी.पवार व श्री.आर.एस.बावसकर तसेच शेतकरी मल्हारी सांगळे, अण्णा केकाण, बाळासाहेब बोरुडे, अण्णा सानप, अंबादास रणबावरे व सांगळे मेजर उपस्थित होते.