अगस्तीच्या आखाड्यात आता पिचड- लहामटेंची अग्निपरीक्षा!

मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड,सिताराम गायकर, यमाजी लहामटे, अशोकराव भांगरे निवडणूक आखाड्यात
सुनील गीते
अकोले दि ६
अगस्ती सहकारी कारखाना निवडणुकीत दुरंगी लढत होत आहे निवडणूक रिंगणात 49 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे
अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले अगस्ती कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे नेते मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ आणि विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे,अगस्तीचे विद्यमान उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर ,ज्येष्ठ नेते अशोक राव भांगरे मधुकर नवले डॉक्टर अजित नवले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस,आरपीआय प्रणित शेतकरी समृद्धी मंडळ असा सामना आता पाहायला मिळणार आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी गट निहाय उमेदवार पुढील प्रमाणे
अकोल्याची कामधेनू असणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 17 जुलै 2022 रोजी मतदान होणार आहे यासाठी आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले तब्बल 287 उमेदवारांपैकी आता निवडणूक रिंगणात फक्त 49 उमेदवार राहिली आहे 8, 342 सभासद या निवडणुकीसाठी मतदार आहेत अगस्ती सहकारी साखर कारखान्याची अकोले, इंदोरी, कोतुळ, आगर, देवठाण अशा पाच गटात या निवडणुकीची रंगत चांगलीच रंगणार आहे
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे
देवठाण गट– भाऊसाहेब वाकचौरे,जालिंदर वाकचौरे, बाबासाहेब उगले, आगर गट– सुधाकर आरोटे ,सुनील कोटकर, किसन शेटे, अकोले गट– माणिक देशमुख, संदीप शेटे ,रामनाथ वाकचौरे इंदोरी गट – भाऊ खरात, प्रकाश नवले वैभवराव पिचड ,कोतुळ गट -, राजेंद्र नानासाहेब देशमुख, बाळासाहेब गणपत सावंत, रावसाहेब तुकाराम शेळके, इतर मागासवर्गीय मतदारसंघात बाळासाहेब काशिनाथ वडजे ,महिला राखीव मतदारसंघात -आरती मालुंजकर , रंजना भाऊसाहेब नाईकवाडी,अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग- मधुकरराव काशीनाथ पिचड, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात- सुभाष बंडू काकडे, उत्पादक पणन संस्था मतदार संघात– राजेंद्र डावरे यांचा समावेश आहे.
व्यवस्था परिवर्तनाच्या नावाने गेल्या काही दिवसांनपासून राजकीय वातावरण ढवळून काढणार्या ज्येष्ठ नेते दशरथ सावंत आणि बी जे देशमुख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने निवडणुकी च्या रिंगणातून अचानक माघार घेतली आहे त्यांनी आपल्या पॅनलचा एकही उमेदवार दिला नाही
राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस ,शिवसेनाआरपीआय या मित्र पक्षांच्या वतीने आमदार डॉक्टर किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, कॉम्रेड अजित नवले ,मधुकराव नवले ,ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखालील
शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाने अकोले गटात -मच्छिंद्र धुमाळ ,कैलासराव वाकचौरे,विक्रम नवले इंदोरी गटात– प्रदीप हासे अशोक देशमुख ,पाटील बा सावंत, आगर गट– पर्वत नाईकवाडी, विकास शेटे,अशोकराव आरोटे
देवठाण गट -सुनील शेळके, रंगनाथ वाघचौरे बादशाह बोंबले कोतुळ गट –यमाजी लहामटे ,मनोज देशमुख ,कैलास शेळके, अनुसूचित जाती जमाती मतदार संघात अशोकराव भांगरे , इतर मागास प्रवर्गात मतदार संघात मिनानाथ पांडे भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघात– सचिन दराडे ,महिला राखीव मतदारसंघात सुलोचना नवले, शांताबाई देशमुख संस्था मतदारसंघात मतदार संघ सिताराम पाटील गायकर यांचा समावेश आहे——
अकोले नगरपंचायत निवडणुकीत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला मधुकर पिचड यांनी धूळ चारली या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लागला त्यानंतर राष्ट्रवादीने चांगलेच मनावर घेतले आणि त्याचा बदला घेते भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीने आपल्या गळाला लावले मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले अगस्ती कारखान्यची निवडणूक जाहीर झाली त्यातच राज्यात सत्तांतर झाले राज्यातील सत्तांतरां नंतर होणारी तालुक्यातील अगस्ती ची निवडणूक होत आहे यामुळे ही निवडणूक प्रतिस्थेची बनली आहे नगर पंचायत नंतर तालुक्यात होणारी सहकारातील पहिली निवडणूक आहे यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे
पिचड- भांगरे आमने सामने !
यापूर्वी च्या अनेक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे मधुकरराव पिचड व अशोकराव भांगरे यांच्या राजकीय लढाया अकोले तालुक्याने पहिल्या आहेत आता अगस्ती कारखान्याच्या निमित्ताने सहकारातील पिचड -भांगरे यांची राजकीय लढाई पुन्हा एकदा होणार आहेत अनुसूचित जाती जमाती मतदार संघात ते आमने सामने आहेत