माका येथील गुरुदेव कॉम्प्युटर CCC बॅच 2022 च्या विद्यार्थ्यांना निरोप….

माका प्रतिनिधी….
माका येथील गुरुदेव कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तर्फे CCC कॉम्प्युटर कोर्स बॅच 2022 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री ज्ञानदेव सानप सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अरुण लोंढे सर होते. यांसमवेत श्री अशोक सानप, दिगंबर शिंदे, भाऊसाहेब कानडे, आदिनाथ गडकर हेही सहकारी उपस्थित होते. यावेळी श्री सानप सर यांनी विद्यार्थ्यांना केंद्र सरकार आयोजित शिशु विकास योजने विषयी मार्गर्शन केले, तर डॉ लोंढे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्लास ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी शिंदे हिने केले. यावेळी तिच्या सहकारी आकांक्षा लोंढे, दिव्या राहिंज, श्वेता म्हस्के, वैष्णवी गुलगे, व करण लोंढे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत क्लास चा तीन महिन्याचा अनुभव सांगितला. यावेळी श्री गुरू क्लास चे श्री मारुती भुजबळ सर व गुरुदेव कॉम्प्युटर चे संचालक नरेंद्र बोंद्रे आणि विनोद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना निरोप दिला.