नेवासा शहरातील 2 कोटी रुपये खर्चाचे विकासकामांचे शंकरराव गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन.

नेवासा प्रतिनिधी
नेवासा येथे मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानावरील बहुउद्देशीय शादीखाना सभागृहासह, नेवासा शहरात सीसीटीव्ही बसवणे,व पथदिवे या विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या हस्ते बुधवार दि.3 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले.
विकास कामांसाठी आपल्या सर्वांची साथ मला हवी आहे,निधी उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष करून पद पणाला लावण्याची माझी तयारी असल्याचे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख साहेब यांनी यावेळी बोलतांना केले.नेवासा येथील ईदगाह मैदानावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहेमततुल्लाखान उर्फ रम्हूशेठ पठाण हे होते.तर गफूरभाई बागवान, अँड.एम.आय.पठाण,,ईदगाह कब्रस्थान स्ट्रटचे अध्यक्ष रहेमानभाई पिंजारी,जुम्माखान पठाण,जब्बारभाई शेख,काष्टी येथील खलीलखान,रामभाऊ जगताप,उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, नंदकुमार पाटील,प्रगतशील शेतकरी संभाजीराव कार्ले,नगराध्यक्ष सतीश पिंपळे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महंमदभाई आतार, राजमहंमद शेख,अस्लमभाई मन्सूरी,महंमदभाई टेलर,मुसाभाई शेख, असिफभाई पठाण, अल्ताफ पठाण,शफी जेटली,शोएब पठाण, अँड.अय्याज पठाण, मुख्तारभाई शेख, फारूकभाई कुरेशी, अँड.जावेदभाई ईनामदार,हारुनभाई जहागिरदार,एजाज पटेल,असिर पठाण,इकबाल शेख,अमीन पठाण,मुमताज शेख,अमीन पठाण आदी उपस्थित होते.
ईदगाहच्या विकासासाठी निधी मिळाला त्यामध्ये सर्वात जास्त सुमारे 85 लाखाचा निधी आमदार शंकरराव गडाख यांनी उपलब्ध करून दिल्याने निकाह सभागृहासाठी उपलब्ध करून दिल्याने या शादी खान्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मुला मुलींची विवाह होतील हे सर्वधर्मीय बांधवांसाठी खुले राहील असे सांगून आमदार गडाख यांना धन्यवाद दिले.

शादीखान्यासाठी 85 लक्ष रु तसेच नेवासा शहराच्या दृष्टीने सुरक्षिततेसाठी महत्वाचे असलेले चौका चौकात सीसीटीव्ही बसवणे या 49 लक्ष रु तसेच शहरात पथदिवे बसवणे या 79 लक्ष रु किंमतीचे असे एकूण 2 कोटी 13 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी मा मंत्री गडाख म्हणाले की मी कधी जाणीवपूर्वक चूक होऊ दिली नाही व चुकीच्या माणसांच्या पाठीशी ही कधी उभा राहिलो नाही त्यामुळे तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मला सर्वांनी साथ द्यावी,विश्वासाचे वातावरण तयार करा,भावनांचा विचार करा,एकमेकांना सांभाळून घेऊन विकास कामांना गती देण्यासाठी पुढे जाऊया असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

शादीखान्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शंकरराव गडाख यांचा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गुलाबपुष्प हार घालून सत्कार करण्यात आला.उपस्थित सर्वधर्मीय बांधवांचा ही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार शंकरराव गडाख म्हणाले की मुस्लिम समाजाच्या शादीखान्याचा प्रश्न प्रलंबित होता त्यातील कागदपत्रांची पूर्तता व्यक्तिगत लक्ष घालून करत मी यासाठी 85 लक्ष रुपये निधीची तरतूद केली व प्रत्यक्ष कामासही सुरवात झाली त्यामुळे नेवासा शहरासह, तालुक्यातील मुस्लिम समाजातील बांधवांना 2 महिन्यातच हा शादी खाना वापरण्यासाठी कार्यान्वित केला जाईल असे जाहीर केले
