नाचनठाव तलावाच्या कामातील गैरव्यवहार, चौकशी साठी टाळाटाळ

१५ ऑगस्ट ला तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा
अकोले प्रतिनिधी
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाचणंठाव ता अकोले येथील पाझर तलावा चे दुरुस्ती कामात मोठा गैर व्यवहार झाला आहे या गैर व्यवहाराची चौकशीची मागणी ग्रामस्थां नी केलीं आहे मात्र ही चौकशी करण्याची सम्बधित यंत्रणा टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत नाचणंठाव येथील समाजिक कार्यकर्ते मच्छीन्द्र बर्वे केला असून 15 ऑगस्ट ला या तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहेत्यांनी याबाबाबत सर्व विभागांना निवेदन दिले आहे यात म्हटले आहे की नाचणठाव येथील पाझर तलावाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ग्रामस्स्थानी वेळोवेळी कार्यालया कडे लेखी निवेदन दिलेले आहेनाचणठाव येथील पाझर तलावाचे लिकेज काढून मिळावे तसेच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन अपूर्ण असलेले काम त्वरित चालू करावे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व तातडीने कारवाई करण्यात यावी.
झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.अशी मागणी करत १ मे महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांच्या बंधाऱ्यावर .बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते गावचे उपसरपंच मच्छिंद्र बर्वे,,बबन जाधव,गणेश जाधव,श्रीकांत जाधव माजी सरपंच मच्छिंद्र मधे,,संदिप जाधव,योगेश जाधव,अरुण जाधव,बाजीराव जाधव,मारुती जाधव,राहुल जाधव,प्रविण शिंदे,नवनाथ जाधव,हरिभाऊ जाधव,कैलास जाधव,बाळासाहेब जाधव आदी ग्रामस्थ यात सहभागी झाले होते यावेळी आमदार डॉ किरण लहामते यांनी तिसऱ्या दिवशी उपोषणार्थींची भेट घेत चौकशी करण्याचे आश्वासन देत उपोषण ग्रामस्थांनी सोडले होते मात्र अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही व कारवाई न झाल्याने आता पुन्हा उपोषण करून जल समाधी घेण्याचा इशारा दिला आहे
सदर पाझर तलाव खूप मोठ्या प्रमाणात लिकेज दिसून येत आहे या बंधाऱ्याचे दुरुस्तीच्या झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही तलावाच्या लिकेज चे प्रमाण आणखी वाढले आहेया कामात मोठा गैर व्यवहार झाला आहे चुकिचे काम करून लोकांना वेठीस धरल्याने दोषींवर कारवाई करावी, चौकशी समिती वेळ काढू पणा करत असून या अधिकारी ठेकेदार यांना पाठीशी घालत आहे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व प्रशासनाच्या वेळ काढू पणाच्या निषेधार्थ आपण या तलावात 15 ऑगस्ट2022 ला जलसमाधी घेणार असल्याचे इशारा दिला आहे मच्छिन्द्र बर्वे बबन जाधव यांनी दिला आहे———