भाजपाच्या नगरसेवकाने जागा बळकावली सैनिकाच्या माता पित्याचा 15 ऑगस्ट ला आत्महत्येचा इशारा!

गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील भाजपा चे माजी नगरसेवक राहुल खंडागळे व नामदेव खंडागळे यांनी प्लॉटवर कब्जा करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांच्या दादागिरीला कंटाळून वडगांव ढोक येथील भारतीय सैन्यदलात व जम्मू काश्मीर येथे कार्यरत सैनिक शाम शिवराम तोळणे यांच्या माता-पित्यांनी न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की दोन महिन्यापूर्वी शासनाला निवेदन दिले होते जिल्हा प्रशासनाने याची दखल न घेतल्याने स्वतः सैनिकाने 15 ऑगस्ट पूर्वी न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदन गेवराई पोलिस स्टेशनला दिले आहे.
दि.08 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी बीड़, तहसीलदार गेवराई,पोलीस उपआयुक्त गेवराई , पोलीस निरीक्षक गेवराई, यांना दिलेल्या निवेदनात जवानाने म्हटले आहे कि मी भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मिर येथे कार्यरत असुन माझ्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.माझ्या भविष्यासाठी माझ्या आई-वडीलानी मोल मज़ुरी करत व गावातील राहते घर विकून गेवराई येथे रजिस्ट्रीची महाग जागा घेण्याची ऐपत नसल्याने 99 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर जागा घेऊन तेथे राहात होते.लॉकडाऊन नंतर मज़ुरीच्या शोधात माझे आई-वडील बाहेरगावी गेले असता गेवराई येथील भाजपचे माजी नगरसेवक व भू-माफिया राहुल शंकर खंडागळे व नामदेव शंकर खंडागळे यांनी माझ्या आई-वडिलांचे राहते घर जमीनदोस्त करून त्यावर कब्जा केला सध्या तेथे पुर्ण गेवराई तालुक्याचा मटका हा जुगार चालवत आहेत.तसेच सदर जागेवर नकली दारूही तयार करत आहे.जागेचा विषय काढला की वेळोवेळी ते माझ्या आई-वडीलाना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.आमची जागा गुंडांच्या कब्ज़ातून काढून आम्हाला न्याय मिळावा यासाठी माझ्या आई-वडीलानी दोन महिन्यापूर्वी दि.03.06 व 04.06.2022 रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद,पोलिस आयुक्त औरंगाबाद,जिल्हाधिकारी बीड़, पोलिस अधीक्षक बीड़, पोलिस उपआयुक्त गेवराई, तहसीलदार गेवराई यांना दिलेल्या निवेदनात न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते.त्यावेळी मी व्यक्तीशः जिल्हाधिकारी साहेब बीड़ यांची भेट घेऊन सदर प्रकरणात न्यायाची मागणी केली होती.याची दखल घेत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी बीड़ व गेवराई येथील प्रशासकीय अधिकार्यांना पत्र पाठवुन आम्हांला न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले होते.परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्या माता-पित्यांची साधी भेट ही घेतली नाही.असे शाम शिवराम तोळणे या जवानाने म्हटले आहे सदर प्रकरणात 15ऑगस्ट पूर्वी न्याय न मिळाल्यास माझे माता-पिता आत्महत्या करण्यावर ठाम असुन अम्हाला न्याय देऊन माझ्या आई-वडीलाना आत्महत्या करण्यापासून रोखावे ,अन्यथा दिलेल्या वेळेत आम्हांला न्याय न मिळाल्यास मी देखील आत्महत्या करीन व याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहिल असे .निवेदनात म्हटले आहे