अहमदनगर
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विधीमंडळात आवाज उठविणार आमदार लंके

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सातत्याने कष्ट करणाऱ्या या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे ही आपली भुमिका आसून त्यासाठी आपण विधीमंडळात आवाज उठविणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
वनकुटे शिवारातील तांबेवाडा, गोरेवाडा, गाडीवाडा येथील धनगर बांधवांच्या वतीने आ. नीलेश लंके यांंच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. लंके हे बोलत होते. यावेळी वनकुटयाचे लोकनियुक्त सरपंच अॅड. राहूल झावरे, उपसरपंच अर्जुन कुलकर्णी, पळशीचे उपसरपंच अप्पासाहेब शिंदे, चेअरमन शिवाजी बरकड, सुरेशनाना नागरे, कारभारी मुसळे, बाळासाहेब बर्डे, शरद गोयेकर, भाऊसाहेब वालझाडे, बबन मुसळे, रामा साळवे, टायगर शेख, आदीनाथ ढवळे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र राजदेव, टाकळीढाकेश्वरचे उपसरपंच किरण तराळ, भाउसाहेब साठे, सोनबा गोरे, राजू तांबे, लोकनेते नीलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश हाके, संचालक सर्वश्री बाळासाहेब पोकळे, संजय काळनर, धोंडीभाऊ टकले, संतोष गोयेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लंके म्हणाले, विधानसभा निवडणूकीमध्ये धनगर समाज माझ्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. मतमोजणी सुरू झाली त्याच वेळी मला आघाडी मिळाली. सुरूवातच धनगर बांधवांच्या आघाडीने झाल्याचे ते म्हणाले. या बांधवांना मला भरभरून प्रेम दिले असून ते मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत. या बांधवांसाठीच्या विविध योजनाही या भागात राबविण्यात येणार आहेत. विकासापासून वचित असलेल्या या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. सात ते आठ महिने भटकंती करणाऱ्या या समाजाच्या जिवनामध्ये परिवर्तन घडले पाहिजे. हा समाज बाहेर भटकंती करीत असताना अनेकदा अडचणी येतात. महाराष्ट्रात कोठेही अडचण आली तर ती दुर करण्याचा मी आजवर प्रयत्न केला आहे. यापुढील काळातही कधीही फोन करा तुमचा भाऊ तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेल.
लवकरच राज्यस्तरीय घोडे स्पर्धा
धनगर बांधवांच्या आवडीच्या घोडयांच्या स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार लंके यांनी यावेळी जाहिर केले. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरील स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार असून तालुक्यात प्रथमच अशा भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अॅड. राहूल झावरे यांनी सांगितले.