वडगाव सावताळ, गाजदीपुर येथील श्री बजरंग बली यात्रा निमित्ताने घोड्यांच्या भव्य शर्यती!

सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले उद्घाटन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
वडगाव सावताळ, गाजदीपुर येथील श्री बजरंग बली यात्रा कमिटी आयोजित घोड्यांच्या भव्य शर्यतींचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अंकुश ढेकळे, उद्योजक बाळासाहेब रोकडे, चेअरमन दादाभाऊ रोकडे, व्हा. चेअरमन चंद्रकांत झिटे, सुभाष करगळ, दादाभाऊ न-हे प्रमुख उपस्थितीत होते.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले पाच वर्षांपूर्वी या घोड्यांच्या शर्यतीचे उद्घाटन करण्याकरीता मी या ठिकाणी आलो होतो. मध्यंतरी कोरोना काळात यात्रेचा कार्यक्रम बंद झाला होता. केंद्र सरकार व राज्य सरकारने देशाचा अमृत महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करायचा म्हणून हर घर झेंडा ही घोषणा केली असून प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा लावण्याचे आव्हान सरकारने केले आहे. देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचे उद्घाटन करताना मला नक्कीच आनंद होत आहे. स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व यात्रेकरुंना मी शुभेच्छा देतो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहनही सभापती दाते यांनी केले. पहिल्या क्रमांक ढोकीचे बन्शी मोरे यांचा घोडा, दुसऱ्या क्रमांक गाजदीपुरचे बाबाजी लकडे यांचा घोडा तर तिसरा क्रमांक ढवळपुरीचे प्रकाश दगडु कोळपे यांच्या घोड्याने पटकावला.
यावेळी अंकुश ढेकळे, बाबाजी लकडे , महादू करगळ, दत्तोबा तिखोळे, लिंबाजी तिखोळे, धुळा कोळपे, सिताराम तिखोळे, हिरामण तिखोळे, बाबुराव तिखोळे, धोंडीबा लकडे, बुधा तिखोळे, गिरजु लकडे, आनंद बिचकुले, पांडुरंग लकडे, भाऊ कोळपे, दामू चोरमले, सखाराम तिखोळे, विष्णू करगळ, आनंद करगळ,पावसा करगळ, बबन करगळ, भाऊसाहेब तिखोळे, बाळु तिखोळे, सुनिल ढेकळे, कांताराम नारनर, सुभाष ढेकळे, बबन ढेकळे, यशवंत करगळ, येसू शिंगटे, भिमा शिंगोटे, आप्पा तिखोळे, धोंडीबा तिखोळे, बाळु कोळपे, पप्पू पायमोडे, नारायण तिखोळे, बिरा कोळपे, अशोक कोळपे, काळुराम तिखोळे, विशाल तिखोळे, लहु तिखोळे, अशोक तिखोळे, अंबादास करगळ, बाप्पू करगळ, बिरा करगळ, मारुती लकडे, रमेश लकडे, सुरेश तिखोळे, अंबादास शिंगोटे, १४ व्या स्पर्धेचे आयोजन गाजीपुर, चिपुळीवाडा, तांबेवाडी, माळवाडीवाडा येथे केले होते. घड्याळ सेकंद बाळाशिराम पायमोडे यांनी पाहिले तर समालोचन बाळासाहेब टेमगिरे यांनी केले.