माका ते देडगाव या जुन्या रस्त्यावर डबक्याचं साम्राज्य

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका ते देडगाव या जुन्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन, ऐन
पावसाळ्यात रस्त्याने ये_जा करतानां बहुतांश ठिकाणी पाण्याचीडबके,अती चिखल व मोठमोठी खड्डे असल्यामुळे रस्त्यासं तलावाचे स्वरुप आले आहे. यामुळे नागरिकांना जीवघेण्या प्रसंगास सामोरे
जावे लागत असुन,या बाबत गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांकडुन खडीकरण तसेच डांबरीकरणाची तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडे मागणी केली जात आहे. याबाबत असे माका,पाचुंदे या रस्त्यास पुर्वीपासुन जोड रस्ताअसलेल्या जुन्या देडगाव रस्त्याने तिन्ही गावातील ग्रामस्थ वस्ती करून राहत आहेत.
ऐन पावसाळ्यात तर, मोठ्या प्रमाणातील खड्डे
व चिखल पाण्याने वस्तीवरील रहिवासी व गावाचा संपर्कच तुटला जात असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.याच रस्त्याने नागरिकांना देडगाव कुकाणा मार्गाने कामकाजा संबधी तालुक्याला जावे लागते.तालुका तसेच गटातील लोकनियुक्त
प्रतिनिधींकडे वेळोवेळी यासंदर्भात मागणी करुनही दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याकारणामुळे परिसरातील नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.