अकोले तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची आर.पी. आय. ची मागणी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर गट चे अकोले तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
अकोले तालुक्यात वारंघुशी, वाकी , मान्हेरे, रंधा, , शेलविहीरे, देवगांव, तसेच अकोले व राजूर शहरात ठीक ठिकाणी अवैध दारु विक्री केली जाते व त्यामुळे गोरगरीबांचे संसार उध्दवस्त होताना दिसतायेत. अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत आहे पोलिस उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांनी बघ्याची भूमिका न घेता तातडीने पावले उचलावी निवेदनाची दखल घेऊन येत्या १५ दिवसात बंद करावेत हे अवैध धंदे बंद न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने उपोषण करण्यात येईल
अकोले तालुक्यातील सर्व अवैध दारु दुकाने, गांजा
विक्री, मटका हे अवैध धंदे येत्या १५ दिवसात बंद न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा आर पी आय चे तालुका अध्यक्ष विजय पवार सचिव सुधीर पवार व कार्यकर्त्यांनी दिला आहे
याबाबत त्यांनी राजूर पोलीस स्टेशन, अकोले पोलीस स्टेशन ,तहसीलदार अकोले उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन दिले आहे