इतर

नाशिक रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी डॉ.गौरव सामनेरकर,

नाशिक/प्रतिनिधी

आरोग्य,शैक्षणिक,सामाजिक उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या .रोटरी क्लब आहे .१९४५ रोजी स्थापन झालेल्या व गेल्या ८० वर्षांची गौरवशाली परंपरा व नावलौकिक असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या २०२५-२०२६ वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली.

निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी माजी अध्यक्ष अॅड.मनीष चिंधडे, शेखर ब्राह्मणकर आणि कमलाकार टाक अशी निवडणूक समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने रोटरी हॉल येथे क्लब असेंबली मध्ये नूतन अध्यक्ष व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक यांची घोषणा केली.

विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे सर्व निवड बिनविरोध पार पडली. डॉ.गौरव सामनेरकर हे जुलै मध्ये पदभार स्वीकारतील.
सीए रेखा पटवर्धन सचिव (प्रशासन), आर्की.मकरंद चिंधडे सचिव (प्रकल्प), श्रीविजय पंडित खजिनदार तर हेमराज राजपूत ह्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नूतन अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर हे प्रतिथयश सुप्रसिद्ध संगणक व्यावसायिक असून सॅमटेक ह्या आयटी कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. तरुण तडफदार डॉ.गौरव सामनेरकर ह्यांनी भरघोस लोकोपयोगी उपक्रम व कार्यक्रमांद्वारे रोटरी सभासदांच्या माध्यमातून नाशिक व परिसरातील नागरिकांसाठी कार्य करण्याचे आश्वस्त केले.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी अध्यक्ष उदयराज पटवर्धन,अनिल सुकेणकर,दिलिपसिंह बेनिवाल,अॅड. मनिष चिंधडे, मुग्धा लेले,प्रफुल्ल बराडीया , डॉ.श्रिया कुलकर्णी, मंगेश अपशंकर तसेच ओमप्रकाश रावत ह्यानी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाश रावत, सूत्रसंचालन डॉ.अक्षता बुरड तर आभार शिल्पा पारख यांनी मानले.


रोटरी क्लब ऑफ नासिक – संचालक मंडळ(2025-2026)
अध्यक्ष – डॉ. गौरव सामनेरकर
उपाध्यक्ष – हेमराज राजपूत
सचिव (प्रशासन )- सीए. रेखा पटवर्धन
सचिव (प्रकल्प ) – आर्कि.मकरंद चिंधडे
सहसचिव – ह्रिषीकेश समनवार
खजिनदार- श्रीविजय पंडित
संचालक प्रशासन – मोना सामनेरकर
संचालक सामाजिक सेवा (वैद्यकीय )- संचालक सामाजिक सेवा- निलेश सोनजे
कार्यक्रम समितीप्रमुख – अॅड. राजेश्वरी बालाजीवाले
रोटरी फाँडेशन चेअरमन- डॉ.नेहा मेहेर (विधाते )
संचालक विन्स – सुरेखा राजपूत
संचालक दत्तकग्राम- भारात बिरारी
जनसंपर्क संचालक – अॅड. विद्युलता तातेड
मेम्बरशिप – अमित पगारे
संचालक रोट्रॅक्ट – डॉ.गौरी कुलकर्णी
संचालक इन्टेरेक्ट : – वैशाली चौधरी ,डॉ.सुप्रिया मंगूळकर ,पवन जोशी
संचालक पर्यावरण – विजय दीक्षित
संचालक लिटरसी – डॉ.सोनाली चिंधडे
संचालक स्किन बँक – डॉ.राजेंद्र नेहेते
संचालक सी.एस.आर – सुहास कुलकर्णी
रोटरीनामा संपादक- स्मिता अपशंकर
फ़ूड कमिटी चेअरमन – वृषाली ब्राह्मणकर
सारजेन्ट अॅट आर्म्स – सोनल , वंदना समनावर लीना बाकरे रोहित देशपांडे
फॅसिलिटेटर : मंगेश अपशंकर
सल्लागार : अॅड. मनिष चिंधडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button