उनो मिंडा कंपनीने भागविली पळवे खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांची तहान

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:
म्हसने फाटा येथील औद्योगिक वसाहती मधील आघाडीची कंपनी उनो मिंडा ही पळवे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची तृष्णा त्यांनी भागवली आहे.
. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कंपनीच्या वतीने शाळेसाठी ही व्यवस्था करून देण्याची ग्वाही देण्यात आली होती. कंपनीने पाण्याची व्यवस्था करून देण्याचा शब्द दिल्यानंतर सैनिक बँकेचे मा.चेअरमन संजय तरटे यांनी वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. दिलेल्या शब्दाप्रमाणे कंपनीने सामाजिक दायित्व फंडातून पाण्याची टाकी तसेच नळ जोड व्यवस्था करून दिली. नळजोड कार्यान्वित झाल्यानंतर कंपनी प्लांट हेड एच आर पांडुरंग गद्दुले, रामदास कोठावळे, सीनियर एच आर सुपा, राजेंद्र धइंजे हब हेड महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, रिजन मोहन पंडित, सी एस आर टीमचे सचिन कामठे, यांनी शाळेत भेट देत पाहणी केली.

कंपनीच्या वतीने परिसरातील गावांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. भविष्यात विविध उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मनोदय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनी व्यवस्थापनाचे ऋण व्यक्त करीत ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
- कंपनीच्या वतीने शाळेसाठी नळजोड देण्यात येऊन पाण्याच्या साठवणुकीसाठी टाकी ही देण्यात आली आहे. ही कंपनी सामाजिक दायित्व फंडातून म्हसने फाटा परिसरातील शाळा तसेच गावामध्ये विविध उपक्रम राबवून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मागील वर्षी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिक्षक दिनाचे अौचित्य साधून पळवे खुर्द येथील शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला.
यावेळी सैनिक बँकेचे मा. व्हा.चेअरमन संजय तरटे, माजी. सरपंच नानाभाऊ गाडीलकर, मसने गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष तरटे, उद्योजक अविनाश ढोरमले, भाऊ जाधव, तसेच दत्तात्रय जगताप, निशांत तरटे, सागर शेळके, बाळासाहेब वाळके, यांच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाभाऊ गाडीलकर यांनी केले.