कळसुबाई शिखरावर भाविकांची दर्शणासाठी अलोट गर्दी

राजुर / प्रतिनिधी
आदिवासींची कुलदेवता समजल्या जाणाऱ्या कळसुबाईच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होत आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे म्हणून त्याला ‘महाराष्ट्रांचे एव्हरेस्ट’ असे सुध्दा संबोधले जाते.
कळसुबाई शिबिराची उंची ही बारी गावाच्या पायथ्यापासून 1646 मी. उंच, इतकी आहे
देवीचे मुळ घराणे हे इगतपुरी तालुक्यामध्ये असून इगतपुरी तालुक्यातील इंदोरच्या शेणे कुटुंबातील आहे घट स्थापनेच्या वेळी नवरात्र मध्ये पाचवे आणि सातव्या माळीला कळसुबाई शिखरावरती वरती ग्रुप गर्दी असते म्हणून या माळेला पाहुण्यांची माळ म्हणून ओळखले जाते: आज दहा ते बारा हजार भाविकांनी हाजरी लावली होती कुळसुबाई शिखराच्या पायवाटेवर पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत 6 इंच उंच व ४५ इंच रुंद अशा 1200 पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी खूपच अवघड रस्ता आहे व पायऱ्या करणे शक्य -नाही अशा त्या ठिकाणी ५०० मीटरच्या अंतरावर नवीन शिडी व रॅलींग वन खात्यामार्फत करण्यात आले आहे.
कळसुबाई ही देवी खरे तर त्र्यंबकेश्वर पासून ते भिमाशंकर पर्यंतच्या आदिवासी, जमातीच्या समन्वयाचे प्रतिक समजले जाते. कळसुबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भाविक येतात . नगर नाशिक मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त भाविक येतात. कळसुबाई शिखरावर छोटे-मोठे हॉटेल असल्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होते. काही ठिकाणी अरुंद शिडी असल्यामुळे गर्दी होत असते तसेच काही अपरित घटना घडू नये म्हणून पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले होते तसेच असे बारीक गावचे सरपंच व सदस्य लक्ष ठेवून आहे
