तिरंगा झेंड्यासोबत सेल्फी फोटो स्पर्धेला’ … उत्स्फूर्त प्रतिसाद

.
—————————-
राज्यातील विविध शहरातून
तब्बल पाचशेहून अधिक महिलांचा सहभाग
—————————-
सोलापूर : यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होताना यामध्ये महिलांचाही सहभाग असला पाहिजे या उद्देशाने सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने राज्यस्तरीय फक्त महिलांसाठीच ‘तिरंगा झेंड्यासोबत सेल्फी फोटो पाठवा.. आणि जिंका आकर्षक साड्या.. अशी अनोखा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला राज्यातील विविध शहरातून जवळपास पाचशेपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेऊन सेल्फी फोटो पाठवला होता. याचे लकी ड्रॉ पध्दतीने निकाल मंगळवारी सकाळी महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून घोषित केले होते.
त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे जिल्हा सहायक सरकारी वकील शैलजा क्यातम यांच्या हस्ते विजेत्या ठरलेल्या प्रथम क्रमांकाचे पुरस्कार भाग्यश्री पुंजाल, द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार वैशाली व्यंकटगिरी यांना तर, चंद्रिका गुल्लापल्ली यांना तृतीय क्रमांकाच्या पुरस्कार देण्यात आला. प्रथम क्रमांकाला ३००० रुपयाची साडी, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे २०००, १००० रुपया किंमतीच्या साड्या अभया साडी सेंटर तर्फे देण्यात आले. याप्रसंगी सहा. सरकारी वकील क्यातम आपले मनोगत व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखी संघमच्या खजिनदार ममता मुदगुंडी यांनी केल्या. अध्यक्षा माधवी अंदे ह्या स्पर्धेच्या आयोजनामागील विस्त्रुत माहिती देत मनोगत व्यक्त केल्या तर, सचिवा राधिका आडम यांनी आभार मानल्या. या स्पर्धेसाठी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी जमुना इंदापूरे यांच्यासह पद्मशाली सखी संघमच्या पदाधिकारी आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
