शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.आमदार डॉ.किरण लहामटे.

संजयकुमार शिंदे यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न.
अकोले/प्रतिनिधी –
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात.ज्ञान दानाचे हे काम शिंदे सरांनी आहोरात्र केले.म्हणूनच शिक्षणाची पताका आहोरात्र खांदयावर घेणारा वारकरी म्हणजेच संजय शिंदे हे आहेत.असे प्रतिपादन आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केले.
अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेचे डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेणित येथील मुख्याध्यापक संजयकुमार शिंदे यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी आमदार डॉ.लहामटे व्यापपिठावरून बोलत होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतिय सचिव लायन अशोक मिस्त्री हे होते. यावेळी आमदार डॉ.सुधिरजी तांबे,शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते,उपसंचालक राजाराम बेंडकोळी,कोषाध्यक्ष विवेकजीमदन,एम.एम.भवारी,
सरपंच गोविंद करवंदे,शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे,संचालक मिलिंदशेठ उमराणी,प्रकाश टाकळकर,विजय पवार,श्रीनिवास एलमामे,प्रकाश महाले,विलास पाबळकर,प्राचार्य बाबासाहेब देशमुख,मनोहर लेंडे,भाऊसाहेब बनकर,मधुकर मोखरे, सदाशिव गिरी,धनंजय पगारे,शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव आरोटे,बी.एस.चौधरी यांसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,आजी माजी विदयार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ.किरण लहामटे यांनी पुढे बोलताना नाते तोडू नका,नाते जोडायचे असतात.शिक्षक आदर्श असतात त्यामुळे जिव ओतुन काम करा.मुलांसाठी जेव्हढे देता येईल तेव्हढे दया.संस्थेत गेलो तर रा.वि.पाटणकर,सावित्रिबाई मदन,बापुसाहेब शेंडे यांचे विचार आठवतात असे विचार व्यक्त केले.

आमदार डॉ.सुधिर तांबे यांनी स्वतःची जाणीव होत नाही तो पर्यंत प्रगती नाही.दुर्गम भागाला प्रकाशमान करण्याचे कार्य केले.अजुनही काही देता येईल का हे महत्वाचे आहे.नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडा.असे विचार प्रतिपादित केले.
आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी रस्ता अडथळयाचा असला तरी मार्ग काढण्यासाठी गुरूचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.शिक्षण दुबळे तर राष्ट्र दुबळे ठरते.म्हणून समाज परिवर्तनासाठी शिक्षक प्रभावी असावा लागतो.जिवनाची वाट सुकर व्हायची असेल तर गुरू शिंदे सरांसारखे प्रभावी असावे.असे विचार प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक मिस्त्री यांनी शिंदे सर हे माणसांचे मन,चेहरे वाचायला शिकले.खास,खळगे अवघड वाटा होत्या,मार्ग मात्र सोपा केला असे विचार व्यक्त करत विदयाविभूषित विदयार्थी घडवल्याचा अभिमान व्यक्त केला.
कोषाध्यक्ष विवेकजी मदन,मिलिंदशेठ उमराणी,आरोटे बाबा,एस.टि.येलमामे,राजेद्र साळवे, पोलिस पाटील संदिप येताळ,प्राचार्य गोर्डे,बाळासाहेब शेलार,दिपक जाधव, श्वेता शिंदे,रमेश वावळे,मच्छिंद्र गायकर,डोळस सर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.विदयार्थीनी स्वाती ठोकळ,आदित्य घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना संजयकुमार शिंदेयांनी,जिवनातील सुख,दु:ख व्यक्त करताना अश्रुंना वाट मोकळी केली.आई वडीलांच्या संस्कारामुळे पवित्र कार्य करण्याचे भाग्य मिळाले.मुलांमधले सुप्त गुण ओळखा.कष्टावर विश्वास तोच स्वाभिमान असून मन मंदिरात आई वडील हेच दैवत आहे.त्यांचे पुजन करा.असे विचार व्यक्त करत आश्रमशाळेतील जीवनाचे वेगवेगळे आनंददायी किस्से व्यक्त करत श्रोत्यांना भरभरून हसवले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक ज्ञानदेव आरोटे यांनी केले.
युराज गभाले यांनी सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.