मंत्र्यांची नात व आमदारांची मुलगी असले तरीजीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो.त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी ग्रामीण भागातील असून तुम्ही न्यूनगंड बाजूला सारून मेडिकल क्षेत्रात या,यश तुमची वाट पाहत आहे असे प्रतिपादन डॉ .मधुरा वैभवराव
अकोले प्रतिनिधी –
आई वडिलांनंतर आपले गुरु आपल्याला ज्ञान देतात ते खऱ्या अर्थाने आपले पालकत्व स्वीकारतात. त्यांच्या प्रति आदरभाव ठेवा.मेडिकल शिक्षण फार अवघड नाही व सोपेही नाही.आपल्या आत्मविश्वास द्वारे आपणाला भविष्यात काय व्हायचे ते आजच ठरवा.मी जरी मंत्र्यांची नात व आमदारांची मुलगी असले तरीजीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो.त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी ग्रामीण भागातील असून तुम्ही न्यूनगंड बाजूला सारून मेडिकल क्षेत्रात या,यश तुमची वाट पाहत आहे असे प्रतिपादन डॉ .मधुरा वैभवराव पिचड यांनी केले .
नुकताच एम.बी.बी.एस. चा निकाल लागला,त्यात माजी आमदार वैभवराव पिचड याची कन्या कु. मधुरा ही विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचा सत्कार राजूर येथील सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी केला .
कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी सरपंच व गगनगिरी महाराज प्रतिष्टानच्या अध्यक्षा सौ . हेमलता पिचड होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी जोशात घोषणा दिल्या तर विद्यार्थ्यांचे डोळ्याचे तपासणी शिबीर उदघाटन डॉ .मधुरा पिचड यांचे हस्ते करण्यात आले .या शिबिरात ३०० विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली .
यावेळी कार्यक्रमास आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे,उपाध्यक्ष सी.बी.भांगरे,स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव बापू काळे, उपसरपंच संतोष बनसोडे ,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, अकोले चे माजी सरपंच संदीपराव शेटे, उद्योजक भारत पिंगळे,योगेश महाले,मुख्याध्यापक विलास महाले,प्राचार्य कैलास तेलोरे,प्राचार्य ,भरत घोरपडे,डॉ वासनिक,डॉ.कडलग,डॉ.राहुल फडके,शांताराम वैद्य उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्या मंजुषा काळे यानी केले .यावेळी श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था,आदिवासी उन्नती शिक्षण संस्था,राजूर ग्रामपंचायत,पत्रकार संघ,विद्यार्थी पालक संघ ,तनिष्का महिला यांच्या वतीने फेटा ,शाल,श्रीफळ, स्मृती चिन्ह देऊन डॉ .मधुरा यांचा सत्कार करण्यात आला .या वेळी ढोल,ताशा,झान्झ,लेझिम यांच्या निनादात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला .यावेळी आदिवासी उन्नतीचे अध्यक्ष भरत घाणे,संस्थेचे सचिव बापू काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय भाषणात सौ हेमलता पिचड यांनी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होऊन अभ्यासाबरोबरच इतर कलागुण जोपासवेत डॉ मधुरा डॉक्टर तर आहेच पण चांगले नृत्य,चित्र,मूर्ती ,व मुक्या प्राण्यावर माया करते हे तिचे गुण वैशिष्ट्ये आहेत.
सुत्रसंचलन,किरण भागवत,श्रीराम पवार, सारिका काळे तर आभार सतीश काळे यांनी मानले
चौकट ..आजोबा यांचे स्वप्न होते मी डॉक्टर व्हावे ते स्वप्न पूर्ण केले असले तरी मी एम एस करून आदिवासी भागातील रुग्णांना उपचार करून त्यांची सेवा करण्याचा माझा मानस आहे .तर महिला,मुलींना आरोग्यबाबत सतर्क करण्यासाठी माझे प्रयत्न असतील .